जाहिरात

Mumbai Airport: मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टवरचे दोन्ही रन-वे 'या' दिवशी बंद राहाणार, मोठं कारण आलं समोर

सकाळी 11 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत हे रनवे बंद असतील.

Mumbai Airport: मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टवरचे दोन्ही रन-वे 'या' दिवशी बंद राहाणार, मोठं कारण आलं समोर
मुंबई:

जगातील सर्वात वर्दळीचे सिंगल-रनवे विमानतळ म्हणून छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्टची ओळख आहे. या विमानतळाची देखरेख इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडच्या माध्यमातून केली जाते. या विमानतळावरून सुरक्षित आणि कार्यक्षम सेवा मिळावी यासाठी विमानतळ प्रशासन नेहमीच प्रयत्नशिल असते. त्याचा एक भाग म्हणून 20 नोव्हेंबर 2025 ला विमानतळाचे दोन रन-वे बंद ठेवण्यात येणार आहे. सकाळी 11 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत हे रनवे बंद असतील.

नक्की वाचा - Mumbai Metro: मुंबई मेट्रो लाईन 4 साठी आणखी एक महत्वाचं पाऊल, एका रात्रीत केलं मोठं काम, पाहा Video

 दोन्‍ही क्रॉस रनवेचे देखरेख व दुरुस्‍ती कामानिमित्त हे तात्‍पुरते बंद राहणार आहेत. पावसाळ्यानंतर ही कामे साधारण पणे हाती घेण्यात येतात. त्यानुसार 20 नोव्हेंबरला हे काम हातात घेण्यात आले आहे. जागतिक विमान वाहतूक मानकांचे पालन, सुरक्षितता आणि विश्वासार्हता सुनिश्चित करण्यासाठी नियोजित बंदचे नियोजन करण्यात आला आहे. विमानचालकांना याबाबत सूचना (NOTAM) आगाऊ जारी करण्यात आल्या आहेत. त्यामुळे एअरलाइन्स आणि इतर भागधारकांना त्यानुसार फ्लाइट वेळापत्रक व मनुष्यबळ नियोजन करता येणार आहे. 

नक्की वाचा - Navneet Rana: नवनीत राणा पुन्हा चर्चेत! या वेळी कारण आहे त्यांची संपत्ती, आकडे पाहून डोळे फिरतील

हे सर्व पुर्वनियोजित असल्यामुळे कोणत्‍याही फ्लाइट्सवर कोणताही परिणाम होणार नाही. प्रवाशांची गैरसोय होणार नाही.  देखरेखीमध्ये तपशीलवार तपासणी, पृष्ठभागाची दुरुस्ती व रनवेवरील प्रकाशयोजना, खुणा आणि ड्रेनेज सिस्टमचे तांत्रिक मूल्यांकन यांचे काम या दरम्यान केले जाणार आहे. मान्सूननंतरची देखरेख सीएसएमआयएच्या वर्षभर चालणाऱ्या ऑपरेशनल सुसज्‍जता उपक्रमाचा अविभाज्य भाग आहे, जो त्‍यांच्या 'सेफ्टी-फर्स्ट' दृष्टिकोनाला दृढ करतो.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com