
रेवती हिंगवे, पुणे
Pune News : भारत-पाकिस्तान तणावादरम्यान तुर्कीने पाकिस्तानला उघड पाठिंबा दिला होता. नैसर्गिक आपत्तीच्या वेळी भारताने केलेल्या मदतीची तुर्कीने अशी परतफेड केली. त्यामुळे देशभरात तुर्कीविरोधात संतापाची लाट आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यातील व्यापाऱ्यांनी तुर्कीच्या सफरचंदांवर बहिष्कार घातल खरेदी थांबवली होती. व्यापाऱ्यांनी घेतलेल्या भूमिकेवरून पुण्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीतील फळ व्यापाऱ्यांना पाकिस्तानातून धमकीचे कॉल आले आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा)
पुण्यातील फळ व्यापाऱ्यांनी तुर्कीतील सफरचंदांवर बहिष्कार टाकल्याने हे मेल आहेत. पाकिस्तानने भारतावर केलेल्या हल्ल्यात तुर्कीचे ड्रोन आढळून आल्याने बॉयकॉट टर्किश प्रोडक्टला सुरुवात पुण्यातील मार्केट यार्डमधून झाली. त्याच पार्श्वभूमीवर फळ व्यापाऱ्यांना आज सकाळी 9:15 वाजेच्या सुमारास धमकीचे व्हॉट्सअप कॉल यायला सुरुवात झाली.
पाकिस्तानातून आलेल्या धमकीनंतर व्यापाऱ्यांनी पुणे पोलीस आयुक्तांकडे धाव घेत याबाबत तक्रार केली आहे. धमकी प्रकरणानंतर व्यापारी अधिकच आक्रमक झाले असून त्यांनी तुर्कीचे सफरचंद रस्त्यावर फेकत आंदोलन केलं.
(नक्की वाचा- Gold Rates: सोने 2000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दरही घसरले; चेक करा आजचे दर)
व्यापाऱ्यांनी तुर्की सफरचंदाऐवजी इराण, वॉशिंग्टन आणि न्यूझलँड सफरचंदाला पसंती दिली आहे. तुर्की सफरचंद बाजारातून गायब झाल्याने इराण, वॉशिंग्टन आणि न्यूझीलंडमधून येणाऱ्या सफरचंदांच्या भावात वाढ झाली आहे. घाऊक बाजारात 10 किलो सफरचंदामागे 200 ते 300 रुपये, तर किरकोळ बाजारात प्रति किलो 20 ते 30 रुपये दराने वाढ झाली आहे.
(नक्की वाचा- Best Bus : 'बेस्ट' भाडेवाढीचा फटका! उत्पन्न वाढलं, मात्र प्रवासी संख्या घटली; पाहा आकडेवारी)
तुर्कीहून होणाऱ्या सफरचंद आयातीवर तात्काळ पूर्ण बंदी घाला, अशी मोठी मागणी हिमाचलच्या शेतकऱ्यांनी केली आहे. हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, उत्तराखंड यांसारख्या हिमालयीन राज्यांमधील सफरचंद उत्पादक शेतकरी सध्या तुर्कीमधून होणाऱ्या प्रचंड सफरचंद आयातीतून निर्माण झालेल्या संकटाला सामोरे जात आहेत. या पार्श्वभूमीवर हजारो शेतकऱ्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संस्थांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world