जाहिरात

Navi Mumbai News : एक मुलगा तुरुगांत, एक फरार; नवी मुंबईत बिल्डरच्या आत्महत्येने खळबळ

ड्रग्स तस्करी प्रकरणी गुरू चीचकर यांना NRI पोलिसांनी चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलावले होते. मात्र या चौकशीच्या विवंचनेतून चीचकर यांनी आत्महत्या केल्याचं त्यांनी मृत्यूपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे.

Navi Mumbai News : एक मुलगा तुरुगांत, एक फरार; नवी मुंबईत बिल्डरच्या आत्महत्येने खळबळ

प्रथमेश गडकरी, नवी मुंबई

Navi Mumbai News : नवी मुंबईतील बांधकाम व्यावसायिक गुरू चीचकर यांनी आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.  बेलापूर येथील किल्ले गावठाण परिसरात आज सकाळी 7 वाजेच्या सुमारास गुरू चीचकर यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. चीचकर यांची सुसाईड नोट देखील पोलिसांना सापडली आहे. पोलिसांना याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मिळालेल्या माहितीनुसार, काही महिन्यांपूर्वी मुंबईच्या अमली पदार्थ पथकाकडून नवी मुंबईत करण्यात आलेल्या कारवाईत सुमारे 200 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त करण्यात आले होते. हे ड्रग्स गुरू चीचकर यांच्या मुलांकडून नवी मुंबईत आणले जात असल्याची माहिती होती. या प्रकरणी या त्यांच्या दोन मुलांपैकी 1 जण फरार असून 1 जण तुरुंगात आहे.

(नक्की वाचा-  Pahalgam Attack: दहशतवाद्याचा फोटो काढणारी महिला आली समोर; रुद्राक्ष आणि कुराणवरुन झाला होता वाद)

ड्रग्स तस्करी प्रकरणी गुरू चीचकर यांना NRI पोलिसांनी चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलावले होते. मात्र या चौकशीच्या विवंचनेतून चीचकर यांनी आत्महत्या केल्याचं त्यांनी मृत्यूपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे.

माझा मोठा मुलगा गैरमार्गाला लागला असून त्याच्याशी आमचे सगळे संबंध संपले आहेत. परंतु, माझ्या लहान मुलाचा या प्रकरणाशी काहीही संबंध नसताना त्याला पोलिसांकडून त्रास दिला जात आहे. याच विवंचनेतून त्रास सहन न झाल्याने गुरु चीचकर जीवन संपवल्याचे कळते आहे. 

(नक्की वाचा- Western Railway : पश्चिम रेल्वेवर 35 तासांचा मेगाब्लॉक; 26-28 एप्रिलदरम्यान 163 ट्रेन रद्द)

गुरू चीचकर यांनी  9 एमएमच्या पिस्टलने स्वतःवर गोळ्या झाडून घेतल्या. पिस्टलचं लायसन्स त्यांच्याकडे नसल्याचे माहिती पोलिसांनी दिली आहे.नेरुळ येथील NRI पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी तपास सुरू केला असून, अधिक माहिती तपासानंतरच स्पष्ट होईल.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: