जाहिरात

मुलाचा मृत्यू, आईचा संताप; जाब विचारताच डॉक्टरकडून शिवीगाळ करत विनयभंग

सीबीडी बेलापूर पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून अपोलो हॉस्पिटल येथील सीसीटीव्ही तपासले जात आहेत. या गुन्ह्यात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

मुलाचा मृत्यू, आईचा संताप; जाब विचारताच डॉक्टरकडून शिवीगाळ करत विनयभंग

राहुल कांबळे, नवी मुंबई

नवी मुंबई अपोलो रुग्णालयात डॉक्टरने मृत रुग्णाच्या आईसोबत गैरवर्तन केल्याचा प्रकार समोर आला आहे. मुलाच्या मृत्यूबाबत जाब विचारला म्हणून संतापलेल्या डॉक्टरने महिलेला शिवीगाळ करत मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी महिलेच्या तक्रारीवरुन पोलिसांनी विनयभंगासह अनेक कलमांर्तगत गुन्हा दाखल केला आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सीबीडी येथील 56 वर्षीय महिलेच्या मुलाचा उपचारादरम्यान 30 मे 2024 रोजी मृत्यू झाला होता. मुलाच्या मृत्यूनंतर महिलेने  अरोलो रुग्णालयाच्या डॉक्टरांवर योग्य उपचार न दिल्याने मृत्यू झाल्याचा आरोप केला होता. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे माझ्या मुलाचा मृत्यू झाला आहे, असे आरोप पीडित महिलेने डॉक्टरांवर केले. पीडितेने डॉक्टरांना याबाबत विचारले तेव्हा डॉक्टरांनी तिला शिवीगाळ केली आणि तिच्या अंगावर धावून तिचा ड्रेस ओढला.

(नक्की वाचा-  ठाकरे गटाच्या नेत्याच्या पुतण्यावर गोळीबाराचा प्रयत्न, खिशातून पिस्तुल काढली, नेम धरला अन्...)

नवी मुंबई सीबीडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीधर गोरे यांनी सांगितले की, "शनिवारी डॉक्टर राजेश शिंदेविरोधात कलम 74 (महिलेवर तिची विनयभंग करण्याच्या उद्देशाने प्राणघातक हल्ला किंवा गुन्हेगारी बळाचा वापर करणे), कलम 79 (शब्द, हावभाव किंवा कृती) या तरतुदींनुसार एफआयआर नोंदवण्यात आला." 

(नक्की वाचा -  शेअर मार्केटमधून जास्त नफ्याचं आमिष, ट्रेडिंगच्या नावाखाली महिलेची 65 लाखांची फसवणूक)

सीबीडी बेलापूर पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून अपोलो हॉस्पिटल येथील सीसीटीव्ही तपासले जात आहेत. या गुन्ह्यात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही, असे पोलिसांनी सांगितले. तक्रार दाखल करण्यास विलंब का झाला हे तक्रारीत स्पष्ट केलेले नाही.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Switch To Dark/Light Mode
Previous Article
मराठा हेच कुणबी ? हैदराबाद गॅझेट नेमकं काय? विश्वास पाटलांचे मोठे संशोधन
मुलाचा मृत्यू, आईचा संताप; जाब विचारताच डॉक्टरकडून शिवीगाळ करत विनयभंग
Girls were being exploited in an ashram at Karad in western Maharashtra
Next Article
आश्रमात ठरतेय मुलींच्या शरीराची किंमत, पश्चिम महाराष्ट्रात दिवसाढवळ्या घडत होतं घृणास्पद कृत्य!