जाहिरात

Central Railway: मध्य रेल्वेवर 15 दिवसांचा मेगा ब्लॉक; लोकल आणि एक्सप्रेस गाड्यांवर कसा होणार परिणाम?

मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील नीला यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे देखभाल मेगा ब्लॉक अत्यावश्यक आहेत आणि यामुळे होणाऱ्या गैरसोयीबद्दल प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Central Railway: मध्य रेल्वेवर 15 दिवसांचा मेगा ब्लॉक; लोकल आणि एक्सप्रेस गाड्यांवर कसा होणार परिणाम?

Central Railway Mega Block: मध्य रेल्वेने पायाभूत सुविधांची देखभाल आणि सिक्युरिटीसाठी 26 सप्टेंबरपासून 15 दिवसांसाठी विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक जाहीर केला आहे. या अंतर्गत कर्जत स्थानकावर यार्ड रीमॉडेलिंग प्रकल्पाशी संबंधित 'प्री नॉन-इंटरलॉकिंग (PNI)' कामे केली जाणार आहेत. या कामामुळे मुंबई लोकलसह लांब पल्ल्याच्या अनेक गाड्यांच्या सेवेवर परिणाम होणार आहे.

मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील नीला यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे देखभाल मेगा ब्लॉक अत्यावश्यक आहेत आणि यामुळे होणाऱ्या गैरसोयीबद्दल प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

27 ते 30 सप्टेंबर दरम्यान दररोज 5 तासांचा ब्लॉक

27 सप्टेंबर (शनिवार) ते 30 सप्टेंबर (मंगळवार) या दरम्यान दररोज सकाळी 11.20 ते सायंकाळी 16.20 पर्यंत वाहतूक ब्लॉक लागू राहील. अप आणि डाउन पनवेल मार्गावर नांगणाथ केबिन आणि कर्जत प्लॅटफॉर्म 2 व 3 दरम्यान, तसेच कर्जत प्लॅटफॉर्म 3 आणि चौक स्टेशन दरम्यान रेल्वे वाहतुकीवर परिणाम होईल. या ब्लॉकच्या कालावधीत कर्जत आणि खोपोली दरम्यान अप आणि डाउन मार्गावरील कोणतीही लोकल ट्रेन सेवा उपलब्ध नसेल.

(नक्की वाचा-  Thane-CSMT Metro: ठाण्याहून थेट CSMT मेट्रोनं गाठा; घोडबंदरची वाहतूक कोंडी फुटणार, 21 लाख प्रवाशांना दिलासा)

लोकल ट्रेन सेवांवर होणारे परिणाम (27, 28 आणि 29 सप्टेंबर 2025)

रद्द झालेल्या डाउन लोकल गाड्या

कर्जत येथून 12, 1.15 आणि 3.39 वाजता सुटणाऱ्या कर्जत-खोपोली लोकल रद्द.

रद्द झालेल्या अप लोकल गाड्या

खोपोली येथून 11.20, 12.40 आणि 2.55 वाजता सुटणाऱ्या खोपोली-कर्जत लोकल रद्द.

शॉर्ट टर्मिनेशन

12.20 वाजता CSMT येथून सुटणारी CSMT-खोपोली लोकल कर्जत येथे शॉर्ट टर्मिनेट होईल म्हणजे ती खोपोलीपर्यंत जाणार नाही.

शॉर्ट ओरिजिनेशन

दुपारी 13.48 वाजता खोपोली येथून सुटणारी खोपोली-CSMT लोकल कर्जत येथून सुटेल म्हणजे ती खोपोलीवरून सुरू होणार नाही.

(नक्की वाचा : Thane Metro ठाणे मेट्रोचा 'ऐतिहासिक' दिवस; 16,000 कोटींचा प्रकल्प 'ट्रॅक'वर, वाचा 13 लाख प्रवाशांना कसा फायदा )

मेल/एक्स्प्रेस गाड्यांवर परिणाम

28 सप्टेंबर 2025 (रविवार)

वळवलेली गाडी: ट्रेन क्रमांक 22194 ग्वाल्हेर-दौंड एक्स्प्रेस ही कल्याण-कर्जत मार्गे वळवण्यात येईल आणि पनवेल येथून चढणाऱ्या प्रवाशांसाठी ती कल्याण येथे थांबेल.

30 सप्टेंबर 2025 (मंगळवार)

कर्जत येथून 12.00 आणि 1.15 वाजता सुटणाऱ्या कर्जत-खोपोली लोकल रद्द.

खोपोली येथून 11.20 आणि 12.40 वाजता सुटणाऱ्या खोपोली-कर्जत लोकल रद्द.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com