जाहिरात

Mumbai Rains : "आम्ही छंद म्हणून बाहेर पडतो का?", मध्य रेल्वेच्या ट्वीटवर प्रवाशाची संतप्त प्रतिक्रिया

मुंबईकरांसाठी लोकल ही केवळ एक वाहतूक व्यवस्था नसून, ती त्यांच्या रोजच्या जगण्याचा एक अविभाज्य भाग आहे. अशा परिस्थितीत, रेल्वे प्रशासन जेव्हा 'प्रवास टाळा' असे सांगते, तेव्हा ते अप्रत्यक्षपणे मुंबईकरांच्या रोजगारावरच प्रश्नचिन्ह निर्माण करतात.

Mumbai Rains : "आम्ही छंद म्हणून बाहेर पडतो का?", मध्य रेल्वेच्या ट्वीटवर प्रवाशाची संतप्त प्रतिक्रिया

Mumbai Rains : मुंबईत सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसाचा जोर कायम असल्याने मुंबईतील अनेक सखल भागत पाणी साचलं आहे. तर मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकल ट्रेनला देखील या पावसाचा फटका बसला आहे. मुंबईत मुसळधार पावसाचा जोर पुढील काही तास असाच राहणार आहे. त्यामुळे मध्ये रेल्वेच्या डीआरएमने देखील ट्वीट करत खबरदारीचा उपाय म्हणून आवश्यकता असेल तरच बाहेर पडण्याचं आवाहन प्रवाशांना केलं आहे. प्रवाशाला मात्र मध्य रेल्वेचे हे आवाहन एकाचांगलंच खटकलं आणि त्या प्रवाशाने देखील मध्य रेल्वेला टोला लगावला आहे.

रेल्वेच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्वीट करत म्हटलं की, आयएमडीने मुंबई परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. प्रवाशांना आवश्यक असेल तरच प्रवास करण्याची आणि सावधगिरी बाळगण्याची विनंती करण्यात येत आहे. रेल्वेच्या या सूचनेला मंदार अभ्यंकर नावाच्या व्यक्तीने कठोर भाषेत उत्तर दिले आहे. 'नोकरी आणि प्रवास मुंबईकर छंद म्हणून करतात का?', असा सवाल विचारत अभ्यंकर यांनी रेल्वेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभे केले.

(नक्की वाचा-  Mumbai Rains Live Updates: मुंबईकरांसाठी पुढील चार तास धोक्याचे! अतिमुसळधार पावसाचा इशारा)

मुंबईकरांसाठी लोकल ही केवळ एक वाहतूक व्यवस्था नसून, ती त्यांच्या रोजच्या जगण्याचा एक अविभाज्य भाग आहे. अशा परिस्थितीत, रेल्वे प्रशासन जेव्हा 'प्रवास टाळा' असे सांगते, तेव्हा ते अप्रत्यक्षपणे मुंबईकरांच्या रोजगारावरच प्रश्नचिन्ह निर्माण करतात.

(नक्की वाचा-  Mumbai Heavy Rain : पावसाचा जोर वाढला; मुंबईतील शाळांना सुट्टी जाहीर)

रेल्वे प्रशासनाने लोकांना धोक्याची सूचना देण्याऐवजी, आपल्या पायाभूत सुविधा मजबूत करण्याची गरज आहे, जेणेकरून कोणत्याही परिस्थितीत वाहतूक व्यवस्था सुरळीत राहील. मंदार अभ्यंकर यांनी विचारलेला प्रश्न हा केवळ एका व्यक्तीचा नसून, तो मुंबईतील लाखो चाकरमान्यांच्या मनात असलेला संताप आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com