जाहिरात

Anurag kashyap : "ब्राह्मणांवर मी...", अनुराग कश्यपची वादग्रस्त कमेंट

अनुराग कश्यप याच्या या टिप्पणीनंतर वाद आणखी वाढला. मात्र प्रकरण चिघळत हे लक्षात येतात आता त्याने माफी मागितली आहे आणि स्पष्टीकरण दिले आहे. अनुराग कश्यप याने इंस्टाग्रामवर एक नवीन पोस्ट शेअर केली आहे.

Anurag kashyap : "ब्राह्मणांवर मी...", अनुराग कश्यपची वादग्रस्त कमेंट

Anurag kashyap : 'फुले' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासूनच वादात सापडला आहे. समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटावर काही संघटनांनी आक्षेप घेतल्यानंतर त्याचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आहे. या चित्रपटावर जातीयवाद पसरवल्याचा आरोप केला जात आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

ब्राह्मणांची केवळ बदनामी यातून केली जात असल्याची संघटनांची नाराजी आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यपने चित्रपटाच्या प्रदर्शनावरील बंदी आणि ब्राह्मण समुदायाने चित्रपटावर व्यक्त केलेल्या आक्षेपाबाबत सेन्सॉर बोर्ड ऑफ सर्टिफिकेशन (सीबीएफसी) बद्दल एक पोस्ट लिहिली, ज्यामुळे एक नवीन वाद निर्माण झाला.

(नक्की वाचा- निधन, श्रद्धांजली, काळजीचे फोन! आता या सर्वांना पोहोचवण्याची वेळ आलीय, आदेश बांदेकर संतापले)

अनुराग कश्यपने त्याच्या पोस्टमध्ये ब्राह्मण समुदायावर टीका केली आणि वादग्रस्त विधान करून आपला संताप व्यक्त केला. जेव्हा युजर्सनी पोस्टवर नाराजी व्यक्त करायला सुरुवात केली, तेव्हा अनुराग कश्यपने 'ब्राह्मणांवर लघवी करेल' असं वक्तव्य करुन आणखी संताप ओढावून घेतला. 

अनुराग कश्यप याच्या या टिप्पणीनंतर वाद आणखी वाढला. मात्र प्रकरण चिघळत हे लक्षात येतात आता त्याने माफी मागितली आहे आणि स्पष्टीकरण दिले आहे. अनुराग कश्यप याने इंस्टाग्रामवर एक नवीन पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये त्याने त्याच्या विधानावर आपली बाजू मांडली आहे. पण माफी मागतानाही त्याने पुन्हा एकदा ब्राह्मणांना लक्ष्य केले.

अनुराग कश्यपची पोस्ट

अनुराग कश्यपची पोस्टनंतर माफीनामा

अनुराग कश्यपने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, "मी माफी मागतो, माझ्या पोस्टसाठी नाही तर त्या एका ओळीसाठी जी संदर्भाबाहेर काढली गेली आणि जी द्वेष निर्माण करत आहे. तुमच्या मुलीला, कुटुंबाला, मित्रांना आणि सहकाऱ्यांना बलात्कार आणि जीवे मारण्याच्या धमक्या मिळाव्यात अशी ती कृती नव्हती."

( नक्की वाचा : Tanisha Bhise Case : दीनानाथ मंगेशकर नाही तर 'या' दोन हॉस्पिटलवर ससूनच्या अहवालात ठपका )

"तुम्ही मला कितीही शिवीगाळ करू शकता, माझ्या कुटुंबाने काहीही केलेले नाही. म्हणून जर मला माफी मागावी लागली तर मी माफी मागेन. ब्राह्मणानो, स्त्रियांना सोडा, इतके चांगले संस्कार शास्त्रांमध्येही आहेत, ते फक्त मनु धर्मातच नाहीत. तुम्ही कोणत्या प्रकारचे ब्राह्मण आहात ते ठरवा. बाकी माझ्याकडून माफी मागतो."

अनुरागला माफी का मागावी लागली?

अनुराग कश्यपच्या पोस्टवर एका युजरने म्हटलं की, "ब्राह्मण तुझे बाप आहे...". यावर संतापलेल्या अनुरागने "मी ब्राह्मणावर लघुशंका करेन... काही हरकत नाही," असा रिप्लाय केला. यावरून वाद निर्माण झाला होता. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: