जाहिरात

अवघ्या काही तासांची प्रतीक्षा, महाराजांची वाघनखं महाराष्ट्रात होणार दाखल; कुठे पाहता येईल?

18 जुलै रोजी शिवाजी महाराजांची वाघनखं महाराष्ट्रात दाखल होणार आहेत.

अवघ्या काही तासांची प्रतीक्षा, महाराजांची वाघनखं महाराष्ट्रात होणार दाखल; कुठे पाहता येईल?
सातारा:

लोकसभा निवडणुकीच्या आधीपासून महायुतीकडून शिवाजी महाराजांची वाघनखं (Shivaji Maharaj Wagh nakha) महाराष्ट्रात आणणार असल्याचा गाजावाजा केला जात होता. मात्र लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतरही वाघनखं महाराष्ट्रात न आल्याने विरोधकांकडून महायुतीला घेरण्याचा प्रयत्न झाला. आता अखेर बहुप्रतिक्षित वाघनखं महाराष्ट्रात दाखल होणार आहेत. 18 जुलै रोजी शिवाजी महाराजांची वाघनखं महाराष्ट्रात दाखल होणार आहेत. पहिल्यांदा साताऱ्यात वाघनखं आणली जाणार आहेत. 

लंडनमधल्या व्हिक्टोरीया ॲंड अल्बर्ड म्युझियमच्या स्वत:च्या खासगी सुरक्षेत वाघनखं साताऱ्यात आणण्यात येतील. विशेष विमानाने ही वाघनखं साताऱ्यात दाखल होतील. यानिमित्ताने 19 जुलै रोजी राज्य सरकारकडून भव्यदिव्य अशा सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम लंडन येथे असणाऱ्या वेगवेगळ्या वाघ नखांपैकी एक वाघनख राज्य सरकार भारतात आणत आहे. तीन वर्षांकरिता ही वाघनखं भाडेतत्त्वावर आणली जात आहेत.

नक्की वाचा - पिंपरी-चिंचवडमध्ये अजित पवारांना धक्का; गव्हाणेंसह 24 जणांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

दरम्यान या वाघनखांवर काहीजणांनी आक्षेपही घेतला आहे. ही वाघनखं शिवाजी महाराजांची नसल्याचा दावा केला जात आहे. आणणार आहे. मात्र याबाबत अनेक आरोप प्रत्यारोप होत असल्याचे पाहायला मिळतंय. ही वाघनखं महाराजांची नसल्याचा दावा कोल्हापूरमधील इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी केलाय. सावंत यांनी पत्रकार परिषद घेऊन हा दावा केला. सरकार भाडेतत्त्वावर लंडनमधून वाघनखे आणत आहे. मूळ वाघ नखं साताऱ्यात असतानाही सरकार भाडेतत्त्वावर आणण्याचा अट्टाहास का करत आहे? असा सवाल इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी केला आहे.  

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com