विशाल पाटील, मुंबई
विधानसभा निवडणुकीत लाजीरवाण्या पराभवानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेजी आज बैठक पार पडली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवतीर्थ येथे ही बैठक पार पडली. या बैठकीला मनसेचे सर्व प्रमुख नेते उपस्थित होते. भाजपशी जवळीक चूक ठरल्याची भावना अनेक उमेदवारांना राज ठाकरेंसमोर बालून दाखवल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून आधीपासून ईव्हीएमबाबत संशय व्यक्त केला जात आहे. आता मनसेच्या बैठकीत पराभूत उमेदवारांनी देखील ईव्हीएमबाबत प्रश्न उपस्थित केले. राज ठाकरेंनी उमेदवारांकडून ईव्हीएमबाबत त्यांची मते जाणून घेतली. भाजपशी जवळीक करणे ही सुद्धा चूक झाली असून उमेदवारांनी याबाबत नाराजी देखील बोलून दाखवली.
याशिवाय बैठकीत भाजपकडून माहीममध्ये अपेक्षित न झालेली मदत आणि त्यामुळे अमित ठाकरेंचा झालेला पराभव, मनसेच्या सर्वच उमेदवाराना कमी झालेले मतदान या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्वाची मानली जाते.
राज ठाकरेंचं इंजिन धोक्यात?
कुठल्याही पक्षाला त्याची मान्यिता टिकवून ठेवण्यासाठी निवडणुकीत 8 टक्के मतदान किंवा 1 आमदार 6 टक्के मतदान किंवा 2 आमदार 3 टक्के मतदान किंवा 3 आमदार गरजेचे असतात. मात्र मनसेचा एकही आमदार निवडून आला नाही आणि मनसेचा व्होट शेअर 1.55 टक्के आहे. त्यामुळे मनसेचं इंजिन चिन्ह जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आता प्रश्न हा, की मनसे पुढे काय करणार. पुढच्या काही महिन्यांत महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका लागतील त्यावेळी मनसेची भूमिका काय असेल असा सवाल उपस्थित केला जात आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world