जाहिरात
This Article is From Jul 19, 2024

वसंत मोरेंना कुणी दिली जीवे मारण्याची धमकी?, ऑडिओ क्लिप व्हायरल

Vasant More News : मनसेच्या कार्यकर्त्यांने धमकी दिल्याचा दावा वसंत मोरे यांनी केला आहे. याप्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यासाठी मागणी वंसत मोरे यांनी केली आहे. 

वसंत मोरेंना कुणी दिली जीवे मारण्याची धमकी?, ऑडिओ क्लिप व्हायरल

शिवसेना ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांने धमकी दिल्याचा दावा वसंत मोरे यांनी केला आहे. याप्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यासाठी मागणी वंसत मोरे यांनी केली आहे. 

वसंत मोरे यांनी एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर शेअर करत लिहिलं की, "मी जर पुन्हा माझ्या जुन्या पक्षात गेलो तर असा काय गुन्हा केला की मनसेवाले माझा मर्डर करण्यापर्यंत गेले. संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यासाठी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन येथे मागणी केली आहे. पाहू पोलीस आता यावर काय भूमिका घेतात."

वसंत मोरे यांचे भाचे प्रतिक कोडितकर यांना अज्ञात व्यक्तीने फोन करुन ही धमकी दिली आहे. "वसंत मोरेचा या महिन्यात विकेट टाकणार. महिना अखरेपर्यंत वसंत मोरेचा विकेट टाकणार. माझ्या नावाने पोलीस तक्रार कर. आधीच 13-14 पोलीस तक्रारी आहेत. अजून एक होईल. परत एक वर्ष जेलमध्ये जाईल आणि पुन्हा बाहेर येईन. मात्र 100 टक्के वसंत मोरेची विकेट टाकणार. मी मनसेचा कार्यकर्ता आहे", असंही धमकी देणार सांगत आहे. 

कोण आहेत वसंत मोरे? 

वसंत मोरे हे पुणे महापालिकेचे माजी नगरसेवक आहेत. ते पुणे मनसेचे शहर अध्यक्षही होते. मनसेचे आक्रमक नेते म्हणून त्यांची पुण्यात ओळख होती. मात्र लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी मनसेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. पुणे लोकसभेची जागा मनसेने लढवाली अशी त्यांची मागणी होती. तशी इच्छाही त्यांनी राज ठाकरेंकडे व्यक्त केली होती. मात्र त्यांची मागणी मान्य झाली नाही. त्यामुळे मनसे सोडण्याचा त्यांनी निर्णय घेतला. त्यानंतर त्यांनी वंचित बहुजन आघाडीकडून लोकसभेची निवडणूक लढवली. मात्र काही दिवसांपूर्वीच त्यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: