जाहिरात

पुणे पाठोपाठ इंदापुरात धमाका! राष्ट्रवादीचा मोठा नेता भाजपच्या गळाला, मंत्री दत्ता भरणेंचं राजकारण संपवणार?

पुणे महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाने स्पष्ट बहुमत मिळवलं असून पुणे जिल्ह्यात दिवसेंदिवस भाजपची ताकद वाढत आहे. अशातच इंदापूरच्या राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यानं भाजपात प्रवेश केल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

पुणे पाठोपाठ इंदापुरात धमाका! राष्ट्रवादीचा मोठा नेता भाजपच्या गळाला, मंत्री दत्ता भरणेंचं राजकारण संपवणार?
Pune BJP Latest News
पुणे:

देवा राखुंडे, प्रतिनिधी 

Pune BJP Latest News : पुणे महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाने स्पष्ट बहुमत मिळवलं असून पुणे जिल्ह्यात दिवसेंदिवस भाजपची ताकद वाढत आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत तब्बल 19 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस सोबत काम केलेले तत्कालीन जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी आज मुंबईत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. गारटकर सध्या अजित पवार गटात पक्षाचं काम पाहत होते. पंरतु त्यांनी आता भाजपात प्रवेश केल्याने इंदापुरात भाजपची ताकद वाढली आहे.आज शनिवारी 17 जानेवारी रोजी मुंबई येथील भाजप कार्यालयात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण,ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे,इंदापूरचे भाजपा नेते प्रवीण माने,मयूर पाटील यांच्या उपस्थितीत गारटकर यांनी कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश केला.याचवेळी गारटकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली.

"अन्यायाविरोधात संघर्ष हेच ब्रीद घेऊन कायम लढत आलो असून आता दुसरी पिढी बरोबर घेऊन चालत आहोत.राष्ट्रसेवा करीत पक्षाचे विचार तळागाळात पोहोचवू आणि मुख्यमंत्र्यांसह सर्वच भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना अभिमान वाटेल असं काम महाराष्ट्रात करून दाखवेल", असा विश्वास गारटकर यांनी व्यक्त केला आहे. प्रदीप गारटकर यांच्या प्रवेशाने इंदापूरसह जिह्यात भाजपाची ताकद वाढली असून याचा फायदा राज्याच्या गतिमानतेला होईल.तुमच्या विश्वासाला भाजपात तडा जाऊ दिला जाणार नाही.असं आश्वासन यावेळी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी गारटकर यांच्यासह कार्यकर्त्यांना दिलं. पक्षवाढीसाठी आम्ही रक्ताचे पाणी करत मेहनत घेऊ. वरिष्ठांनी आमच्यावर असाच विश्वास दाखवावा.पक्षाचे विचार तळागाळापर्यंत पोचवल्याशिवाय आम्ही राहणार नाही.असं इंदापूरचे भाजपचे नेते प्रवीण माने यांनी म्हटलं आहे. 

नक्की वाचा >> Pimpari-Chinchwad Winners List : पिंपरी-चिंचवडच्या सर्व 32 प्रभागाच्या विजयी उमेदवारांची यादी, वाचा सर्व नावे

अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठी टक्कर दिली होती, कारण..

नुकत्याच पार पडलेल्या इंदापूर नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजपचे नेते प्रवीण माने, शरद पवार गटाचे नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि प्रदीप गारटकर यांनी स्थानिक आघाडी करत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठी टक्कर दिली होती. प्रदीप गारटकर हे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार होते,यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.मात्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या मोठ्या ताकतीपुढे ही मोठं मताधिक्य मिळवण्यात गारटकर यशस्वी झाले. 

मंत्री भरणे यांना सलग तीन टर्मला निवडून आणण्यात गारटकर यांनी खंबीर साथ दिली,माझ्यामुळेच भरणे आमदार आणि मंत्री झाले,आता पुढील निवडणुकीत त्यांना पराभूत करणं हे एकमेव टार्गेट असल्याचंही गारटकर म्हणाले होते. 2004 साली गारटकर यांनी शिवसेनेच्या चिन्हावर इंदापूर विधानसभेची निवडणूक लढवली होती.त्यावेळी त्यांचा पराभव झाला.पण त्यांनी 75 हजार मताधिक्य मिळवले होते.2006 साली गारटकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गेले,पुढे पुणे जिल्हाध्यक्ष झाले.जिल्हाध्यक्ष पदावर जवळपास सलग अनेक वर्ष राहिल्याने पुणे जिल्ह्यात त्यांचा जनसंपर्क असल्याने त्याचा फायदा आता थेट भाजपाला होणार आहे.

नक्की वाचा >> Who Will Be New Mayor Of Mumbai : कोण होईल मुंबईचा नवा महापौर? भाजपच्या 'या' 5 नगरसेवकांची दिवसरात्र चर्चा

'आजपर्यंत दोस्ती पहिली आता दुश्मनी पाहा'

आजपर्यंत दोस्ती पहिली आता राजकीय दुश्मनी पहा असं खुल आव्हानच गारटकर यांनी यापूर्वीच मंत्री दत्तात्रय भरणे यांना दिलं आहे. सध्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागल्या आहेत.एकीकडे जिल्ह्यात आपला होल्ड कायम ठेवण्यासाठी आणि मताचे विभाजन टाळण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी एक झाल्यात.दुसरीकडे भाजपचे नेते प्रवीण माने आणि माजी आमदार यशवंत माने यांना प्रदीप गारटकर हे हजारो कार्यकर्त्यांसह साथ देणार आहेत.त्यामुळे पुण्याच्या इंदापुरात राष्ट्रवादीची भाजपसोबत कडवी टक्कर होणार हे मात्र नक्की.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com