जाहिरात

Political News : फडणवीस सरकारचा आणखी एक निर्णय, एकनाथ शिंदेंना धक्का

Maharashtra Political news : दिलीप वळसे पाटील, राणा जगजितसिंग पाटील, राजेश क्षीरसागर यांची मित्र संस्थेच्या नव्याने निवड उपाध्यक्ष पदावर करण्यात आली आहे. यासह मुख्य सचिव यांसह इतर महत्वाचे सिंचन संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

Political News : फडणवीस सरकारचा आणखी एक निर्णय, एकनाथ शिंदेंना धक्का

महायुती सरकार स्थापन झाल्यापासूनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात शीतयुद्ध सुरु असल्याच्या चर्चा आहे. फडणवीस सरकारचे अनेक निर्णय आहेत ज्याचा थेट संबंध एकनाथ शिंदे यांच्याशी आहेत. फडणवीस सरकारने घेतलेले अनेक निर्णय एकनाथ शिंदे यांना धक्का मानला जात आहे. असाच आणखी एक निर्णय फडणवीस सरकारने घेतला आहे.   

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे अजय अशर यांना महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन म्हणजेच मित्र संस्थेच्या नियमित मंडळावरून हटवले आहे. दिलीप वळसे पाटील, राणा जगजितसिंग पाटील, राजेश क्षीरसागर यांची नव्याने निवड उपाध्यक्ष पदावर करण्यात आली आहे. 

यासह मुख्य सचिव यांसह इतर महत्वाचे सिंचन संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याआधी एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय अजय अशर हे या मित्र संचालक पद समितीत होते. आता पदावरून हटवले आहे.

(नक्की वाचा- CM फडणवीसांचा एकनाथ शिंदेंना आणखी एक धक्का, शिंदेंनी नियुक्त केलेल्या अधिकाऱ्याला केले पदमुक्त)

कैलास जाधव यांना MSRDC च्या सह संचालकपदावरुन केले पदमुक्त 

याआधी फडणवीस सरकारने एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना एमएसआरडीसीच्या सह संचालकपदी नियुक्ती केलेल्या कैलास जाधव यांना सेवामुक्त केले होते.  कैलास जाधव यांना तात्काळ सेवामुक्त करण्याचे आदेश सामान्य प्रशासन विभागान काढले होते. निवृत्त झालेल्या जाधव यांच्या जागी आता वैदेही रानडे यांच्याकडे कार्यभार देण्याचे आदेश दिले आहेत. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: