
मेट्रो-3 प्रकल्पाचा पहिला टप्पा हा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या 12 किलोमीटरच्या टप्प्याचे उद्घाटन केले जाईल अशी शक्यता आहे. हा मार्ग खुला झाल्यास असंख्य मुंबईकरांना त्याचा फायदा होईल. कुलाबा ते सीप्झ असा मेट्रो 3 चा हा मार्ग असून यातील पहिला टप्पा हा आरे ते बीकेसी असा आहो. तो मुंबईकरांसाठी खुला होण्याची शक्यता आहे. हा मार्ग 2021 साली पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र याच्या तसे झाले नाही. सतत तारखा बदलल्या गेल्या. त्यानंतर डिसेंबर 2023 पर्यंत हा मार्ग पूर्ण होणे अपेक्षित होते. ही तारीख देखील हुकली. त्यानंतर जून 2024 पर्यंत हा मार्ग पूर्ण होईल असे सांगण्यात आले होते. आरेमध्ये जागा मिळवणे, झाडे कापण्यासाठीची परवानगी मिळवणे, कंत्राटदारांचा सुस्तपणा या सगळ्या गोष्टींमुळे या मार्गाचे काम रखडले होते.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
या मार्गावरील पहिला टप्पा हा 12 किलोमीटरचा आहे. यामध्ये 10 स्टेशनचा समावेश आहे. 3 ते 5 सप्टेंबरमध्ये या मेट्रो मार्गाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या मार्गावरील पहिला टप्पा हा पश्चिम उपनगरातील ठिकाणे जोडणारा असेल. तर या मार्गाचा दुसरा टप्पा हा दक्षिण मध्य मुंबई आणि दक्षिण मुंबईला पश्चिम उपनगरांशी जोडणारा असेल. संपूर्ण प्रकल्पाची लांबी ही 33 किलोमीटर इतकी आहे.
ट्रेंडिंग बातमी - भाजपचा अंतर्गत सर्वे, पक्षानं घेतला धसका? चाणक्य मैदानात उतरणार
पहिल्या टप्प्यातील सांताक्रूझ मेट्रो स्थानकात उतरून मुंबई उपनगरीय रेल्वे स्थानकात पोहोचता येईल. सांताक्रूझ मेट्रो स्थानकातून मरोळ मेट्रो स्थानकात जाता येईल. तिथून घाटकोपरपर्यंत मेट्रोने पोहोचता येईल. या मेट्रोने मध्य रेल्वे मार्गापर्यंत पोहोचण्यासाठी थोडा द्राविडी प्राणायाम करावा लागणार असला, तरी वाहतूक कोंडीत न अडकता तिथपर्यंत लवकर पोहोचणे शक्य होणार आहे.
कफ परेड ते आरे अशी ही जवळपास तेहत्तीस किलोमीटरची मेट्रो लाईन असले. ही मेट्रो दक्षिण मुंबईतल्या जुन्या नव्या इमारती क्रॉस करत मध्य मुंबईत येईल. मध्य मुंबईत ही मिठी नदीच्या खालून पश्चिम मुंबईतल्या आरेच्या जंगलात पोहोचेल. मिठी नदीच्या खालून बोदद्यातून ही मेट्रो जाणार आहे. हा बोगदा जवळपास 22 ते 25 मिटर खोल खाली खोदण्यात आला आहे. मेट्रो 3 च्या मार्गावर एकूण 27 स्थानकं असतील. विशेष म्हणजे यातील 26 स्टेशन ही भूमिगत असल्याची माहिती आहे.
आरे मध्ये मेट्रोचे कारशेड असणार आहे. त्यामुळे आरेचे स्थानक हे जमिनीलगत असणार आहे. मात्र कफ परेड , विधान भवन , चर्चगेट मेट्रो , हुतात्मा चौक, सीएसटी मेट्रो, काळबादेवी, गिरगाव, ग्रॅण्टरोड , मुंबई सेन्ट्रल, महालक्ष्मी , नेहरू विज्ञान केंद्र, आचार्य अत्रे चौक, वरळी, सिध्दीविनायक, दादर, शितळादेवी मंदिर, धारावी, बिकेसी, विद्यानगरी, सांताक्रुज, विमानतळ, आंतरराष्ट्रीय विमानतळ, मरोळ नाका, एमआयडीसी , सिप्झ, ही सर्व स्टेशन ही भूमिगत असणार आहे. ही मेट्रो मुंबईकरांसाठी पर्वणी असणार आहे. शिवाय प्रवासाचा वेळ वाचवणारी ठरणार आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world