पुण्यात गणेशोत्सवाचे (Pune Ganeshotsav) दहा दिवस ड्राय डे ठेवण्यात यावा अशी मागणी काही गणपती मंडळांनी आयुक्तांकडे केली आहे. बऱ्याचदा गणपती मिरवणूक दारू पिऊन धिंगाणा घातला जातो. याला आळा घालण्यासाठी या दहा दिवसात दारूबंदी करावी अशी मागणी जोर धरत असताना पुणे गणेशोत्सवाबाबत आणखी एक निर्णय घेण्यात आला आहे.
वैभवशाली विसर्जन परंपरा असलेल्या पुण्यातील विसर्जन मिरवणुकीत गेल्या काही वर्षांपासून डोळे दिपवणाऱ्या प्रकाशझोतांचा (लेझर बीम) वापर करण्यात येत आहे. लेझर प्रकाशझोतांमुळे डोळ्यांना इजा पोहोचल्याच्या घटना गेल्या वर्षी घडली होती. त्यामुळे पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी विसर्जन मिरवणुकीत लेझर प्रकाशझोतांचा वापर करण्यास बंदी घातली आहे.
प्रकाशझोतांचा वापर केल्यास कारवाईचा इशारा पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला. पुणे आयुक्तांनी मोठा निर्णय घेतला असून पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीत अखेर लेझरवर बंदी आणण्यात आली आहे. पुणे पोलीस प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यंदाच्या विसर्जन मिरवणुकीत लेझर बिम लाईट लावल्यास मंडळांवर कारवाई करण्यात येणार आहे. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी याबाबत माहिती दिली.
नक्की वाचा - पुण्यात गणेशोत्सवाचे 10 दिवस ड्राय डे? कायदा-सुव्यवस्थेसाठी मंडळांनी केली मागणी
यासंदर्भात पुणे पोलीस आयुक्तांनी गणेश मंडळांसोबत आयुक्तालयात बैठक आयोजित केली होती. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. याशिवाय अनेक गोष्टींवर यावेळी चर्चा झाल्याची माहिती आहे.
बैठकीत खालील मुद्द्यांवर झाली चर्चा
1 ढोल ताशा पथकांच्या वादनाची वेळ निश्चित करण्यात येणार
2 ढोल ताशा पथकातील वादकांची संख्या निश्चित करण्यात येणार
3 लक्ष्मी रस्त्यासह केळकर आणि कुमठेकर रस्त्यावर वर्षानुवर्ष मिरवणूक काढणाऱ्या मंडळांनाच परवानगी
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world