
Ajit Pawar : शालेय अभ्यासक्रमात इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषेची सक्ती नको, यासाठी मनसे आणि शिवसेना आक्रमक झाले आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हिंदी भाषेच्या सक्तीला विरोध दर्शवला होता. हिंदी भाषेच्या विरोधात राज ठाकरे यांनी सर्वपक्षीय मोर्चाची हाक दिली आहे. उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक राजकीय पक्ष या मोर्चा सहभागी होणार आहेत. आता हिंदी भाषेविरोधात भूमिका घेतलेले अजित पवार मोर्चात सहभागी होणार का असा प्रश्न उपस्थित होत होता.
मात्र भूमिका सारखी असली तरी हिंदी भाषेवरून मनसेने आयोजित केलेल्या सर्वपक्षीय मोर्चाला अजित पवार एनसीपी समर्थन नसणार आहे. सरकारमध्ये असून ही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हिंदी भाषा पहिल्यापासून नको भूमिका घेतली होती, त्यानंतर ५ जुलै मोर्चाबाबत काय भूमिका घेणार याकडे लक्ष होते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी एनडीटीव्ही मराठीवर बोलताना आपली भूमिका मांडली. एनसीपी 5 जुलै मोर्चा हिंदी भाषेविरोधात निघणाऱ्या मोर्चाला समर्थन करत नाही. हिंदी भाषा पहिलीपासून असावी का? याबाबत अजित पवार यांनी मत मांडले आहे. मात्र पण मोर्चाला आमचे समर्थन नसेल असं देखील तटकरे यांनी स्पष्ट केले.

AJit Pawar
राज ठाकरेंच्या घरासमोरील बॅनर चर्चेत
हिंदी सक्तीच्या विरोधात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र मोर्चा काढण्याच्या तयारीत असतानाच आता या मोर्चात सहभागी होण्यासाठी मनसेकडून ठिकठिकाणी अनेक बॅनर लावण्यात आले आहेत. यापैकीच एक महत्त्वाचं बॅनर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरासमोर लावण्यात आला आहे.
ज्यामध्ये अजित पवारांचं वक्तव्य छापण्यात आलं आहे. "इयत्ता पाचवीपर्यंत मुलांनी मातृभाषेतच शिकावं. इतर कोणत्याही भाषेत शिकू नये. कोणत्या भाषेला माझा विरोध नाही, मात्र लहान वयात लहान मुलांवर भाषांचं ओझं लादणं बरोबर नाही", असं लिहिलं आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world