महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून 6 दिवस उलटून गेले आहेत. विधानसभेचा कार्यकाळही 26 नोव्हेंबरला संपला आहे. सरकार कोण बनवणार हेही ठरले आहे. पण मुख्यमंत्री कोणाला करायचे हे ठरलेले नाही. गेल्या सहा दिवसांपासून बैठकांवर बैठका सुरु आहेत. गुरुवारी दिल्लीत गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत महायुतीची रात्री उशिरा बैठक झाली. त्यात देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार सहभागी झाले होते.
तब्बल 2 तास चाललेल्या बैठकीनंतरही काहीही निर्णय होऊ शकला नाही. शुक्रवारी मुंबईत महायुतीच्या दोन बैठका होणार होत्या. या शेवटच्या क्षणी रद्द करण्यात आल्या. दरम्यान, एकनाथ शिंदे हे अचानक सातारा येथील त्यांच्या गावी गेले. त्यांच्या सातारा दौऱ्याने अनेक गोष्टींची चर्चा सुरु झाली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मुख्यमंत्रिपदाचा दावा सोडल्यानंतर एकनाथ शिंदे नवीन सरकार स्थापनेच्या सूत्रावर खूश नसल्याची चर्चा आहे. मात्र, शिवसेना नेते उदय सामंत यांचे म्हणणे आहे की, शिंदे नाराज नाहीत, ते काही कामानिमित्त त्यांच्या गावी गेले आहेत. शनिवारपर्यंत परतण्याची शक्यता आहे. मात्र विधानसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतरही भाजपला नव्या मुख्यमंत्र्यांचे नाव ठरवायला एवढा वेळ का लागतोय? याबाबत जाणून घेऊया.
निवडणुकीत भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्याने देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, असे मानले जात आहे. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्यासाठीही प्रयत्न सुरू होते. तर अजित पवार यांनी त्यांचे पत्ते उघड केले नाहीत. दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी 27 नोव्हेंबरला मोठी घोषणा केली. सरकार स्थापनेमध्ये मी अडथळा बनणार नाही म्हणत त्यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा दावा सोडला.
शिंदे गटाला हवेत 12 मंत्रिपदे
सूत्रांच्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला गृहखात्यासह तीन मोठी सोबत 12 मंत्रीपदे हवी आहेत. मात्र गृहखातं शिंदेंना द्यायला भाजप तयार नसल्याची माहिती समोर येत आहे. तर अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीला मंत्रिमंडळात 9 जागा मिळू शकतात. महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांसह जास्तीत जास्त 43 मंत्री असू शकतात. भाजप 50 टक्के मंत्रीपदे स्वत:कडे ठेवणार असल्याची चर्चा आहे.
( नक्की वाचा : EVM तर फक्त बहाणा, काँग्रेसला निवडणूक निकालापूर्वीच लागली होती पराभवाची चाहूल, सत्य उघड )
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होणार का?
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होतील यांची शक्यता फारच कमी आहे. शिवसेना नेते संजय शिरसाट यांनीही शुक्रवारी माध्यमांच्या प्रश्नावर सांगितले की, एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार नाहीत. तर पक्षातील दुसऱ्या चेहऱ्याची या नियुक्ती होईल. ते उपमुख्यमंत्रीपद स्वीकारतील असे वाटत नाही.
भाजप विधीमंडळ नेता कोण होणार?
भाजपच्या विधीमंडळ नेत्याचीही अजून निवड झालेली नाही. भाजप विधीमंडळ नेत्याची निवड कधी होणार हेही अजून स्पष्ट नाही. विधीमंडळ नेत्याच्या निवडीसाठी भाजप आमदारांना निरोप देखील अद्याप गेलेला नाही. आधी भाजपनं विधीमंडळ नेता निवडावा नंतरच खात्यांवर चर्चा होईल अशी भूमिका शिंदे गटाने घेतली आहे. विधीमंडळ नेता निवडीला उशीर होत असल्यानं देवेंद्र फडणवीसांच्या नावाबद्दलही सस्पेन्स कायम आहे.
(नक्की वाचा: वक्फ बोर्डाला 10 कोटी, 24 तासात निर्णय रद्द; देवेंद्र फडणवीसांकडून स्पष्टीकरण)
मुख्यमंत्री निवडीसाठी एवढा वेळ का लागतोय?
मुख्यमंत्रिपदाची निवड करताना जातीय समीकरण लक्षात ठेवले जाईल, असे मानले जात आहे. 288 जागांच्या विधानसभेत मराठा समाजाचे आमदार मोठ्या संख्येने आहेत. तर देवेंद्र फडणवीस हे ब्राह्मण आहेत. अशा स्थितीत भाजपला सर्व समीकरणे एकत्र बघायची आहेत. मात्र, या सगळ्यानंतरही फडणवीस मुख्यमंत्री होण्याची शक्यता जास्त आहे.