
इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाने (IGNOU) जुलै 2025 सत्रासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे. पुण्यातील बालेवाडी येथे नव्याने इमारत बांधण्यात आली असून या इमारतीतून इग्नूच्या पुणे केंद्राचे कामकाज सुरू झाले आहे. ही इमारत तीन मजल्यांची असून इथे विद्यार्थ्यांना उत्तम सहाय्य मिळावे यासाठीची सगळी काळजी घेण्यात आल्याचा दावा करण्यात येत आहे.
( नक्की वाचा: मार्क कितीही असो अॅडमिशन फिक्स, एका सीटसाठी किती पैसे घेतात माहिती आहे? )
इग्नूत कधीपर्यंत अॅडमिशन घेता येईल ?
इग्नूमध्ये (IGNOU) प्रमाणपत्र, डिप्लोमा, पदवीधर, पदव्युत्तर, पदव्युत्तर प्रमाणपत्र आणि डिप्लोमा अभ्यासक्रमांसाठी प्रवेश खुले आहेत. इच्छुक विद्यार्थी अधिक माहितीसाठी इग्नूच्या अधिकृत वेबसाइट www.ignou.ac.in ला भेट देऊ शकतात. विद्यार्थी कोर्सेसची माहिती देणारे माहितीपत्रक विनामूल्य डाउनलोड करू शकतात. जुलै 2025 या सत्रासाठी जर तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल तर 15 जुलै ही त्यासाठी अखेरची तारीख आहे. शिकण्याची प्रबळ इच्छा असलेल्या मात्र नियमितपणे कॉलेजला जाऊ न शिकणाऱ्यांना इग्नूने पुढील शिक्षणाचे मार्ग खुले केले होते. एखादी व्यक्ती कामावर जाणारी असेल मात्र तिला पुढील शिक्षण घ्यायचे असेल तर ती व्यक्ती इग्नूतून शिकू शकते.
( नक्की वाचा: IOB LBO च्या परीक्षेसाठी प्रवेशपत्र मिळण्यास सुरूवात, कसे कराल डाऊनलोड, कधी आहे परीक्षा? )
अभ्यासक्रमांसाठी वयोमर्यादा किती आहे?
इग्नू कमी शुल्कात विविध अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांना प्रवेश देते. इथे शिकण्यासाठी कोणतीही वयोमर्यादा नाही हे विशेष. इग्नूने स्वयंमप्रभा स्टुडिओचीही स्थापना केली आहे, जिथे पदवी अभ्यासक्रमांसाठी मराठी भाषेत अध्यापन-शिक्षण सत्रे आयोजित केली जातील. याशिवाय प्रादेशिक केंद्राच्या आवारात एक स्थानिक विद्यार्थी सहाय्य केंद्र (लर्नर सपोर्ट सेंटर) देखील सुरू करण्यात आले आहे. यामुळे पुणे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना उत्तम सहाय्य मिळेल असा दावा करण्यात आला आहे. इग्नूच्या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनी rcpune@ignou.ac.in वर ईमेल करावा किंवा 020-29911579 या क्रमांकावर संपर्क साधून त्यांच्या शंकांचे निरसन करून घ्यावे असे आवाहन करण्यात आले आहे.
( नक्की वाचा: छत्रपती संभाजीनगरचा डंका, CA अंतिम परीक्षेत राजन देशातून पहिला; जिल्ह्यातील 7 विद्यार्थी रँकमध्ये )
मार्च 1991 मध्ये इग्नू प्रादेशिक केंद्र, पुणे स्थापन करण्यात आले. महाराष्ट्रातील दूरस्थ शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मदत करणे आणि त्यांना आवश्यक सहाय्य पुरवणे हे त्याचे मुख्य उद्दिष्ट होते.1991 मध्ये हे केंद्र सुरू झाले तेव्हा, पुणे कार्यालय महाराष्ट्रासाठी मुख्य केंद्र होते आणि ते 13 अभ्यास केंद्रांची देखरेख करत होते. 1991 पूर्वी, अहमदाबाद प्रादेशिक केंद्र महाराष्ट्रातील अभ्यास केंद्रांची जबाबदारी सांभाळत होते. कालांतराने, अधिक अभ्यास केंद्रांची गरज वाढल्यामुळे महाराष्ट्रात मुंबई आणि नागपूर येथे आणखी दोन प्रादेशिक केंद्रे सुरू करण्यात आली. सध्या, पुणे प्रादेशिक केंद्र पश्चिम महाराष्ट्रातील 15 जिल्ह्यांना आणि मराठवाड्यातील काही भागांना सेवा पुरवते.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world