जाहिरात

'त्रिशूळ'चा बूंग बँग! आकाशातील गडगडाटी आवाजांमुळे मुंबईकर टेन्शनमध्ये

Fighter Jets Over Mumbai: काही मुंबईकरांनी व्हिडीओ काढून हा आवाज टीपण्याचा प्रयत्नही केला.

'त्रिशूळ'चा बूंग बँग! आकाशातील गडगडाटी आवाजांमुळे मुंबईकर टेन्शनमध्ये
मुंबई:

गेल्या काही दिवसांत आकाशातील गडगडाटी आवाजांमुळे मुंबईकरांमध्ये दहशतीचं वातावरण पसरलं होतं. मुंबईवर काही विमानं सातत्याने घिरट्या घालत होती. मुंबईकरांसाठी ही बाब नवी होती आणि या जेट विमानांच्या आवाजामुळे ते धास्तावले होते. काही मुंबईकरांनी व्हिडीओ काढून हा आवाज टीपण्याचा प्रयत्नही केला. मुंबई शहराच्या क्षितीजावर भारतीय हवाई दलाच्या सुखोई (Sukhoi Su-30MKI) ही लढाऊ विमाने घिरट्या घालताना दिसली होती. ही विमानं कमी उंचीवरून जात असल्याने त्यांचा आवाज थरकाप उडवणारा होता. 

नक्की वाचा: 'The Washington Post'च्या पत्रकार राणा अय्यूब यांना जीवे मारण्याची धमकी; नवी मुंबईत गुन्हा दाखल

मुंबईवर सुखोई विमाने घिरट्या का घालत होती ?  

भारतीय सैन्य दलांचा एकत्रित सराव सुरू आहे. हवाईदल, नौदल आणि सैन्यदलाच्या या एकत्रित सरावाला 'त्रिशूळ' नाव देण्यात आले आहे. तीनही दलातील सामंजस्य वाढावे, एकत्रितपणे कारवाई करत असताना कोणत्याही त्रुटी राहू नये यासाठीचा ताळमेळ उत्तम असावा यासाठी हा सराव आयोजित करण्यात आला होता. कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी आपले सैन्य दल सज्ज आहे हा संदेश या संयुक्त अभियानाद्वारे देण्यात आला आहे.  

नक्की वाचा: 'खान'ला मुंबईचा महापौर होऊ देणार नाही! न्यूयॉर्कच्या निकालानंतर भाजपा नेत्याचा इशारा, अर्थ काय?

सोशल मीडियावर सुसाट चर्चा

सुखोई विमानं मुंबईवर घिरट्या घालत असल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले जाऊ लागले. सिद्धांत राजाध्यक्ष यांनीही एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर (Instagram) शेअर केलाय.

त्यांनी व्हिडीओ शेअर करताना म्हटलंय की, "मुंबईकरांनी तुम्ही आकाशात गडगडाटी आवाज ऐकला का ? त्यामागचं खरं कारण हे आहे. भारतीय सैन्याच्या तीनही दलांनी एकत्रित येत 'त्रिशूळ' सराव सुरू केलाय. तीनही दले किती सज्ज आहेत हे यावरून दिसून येतं." ही पोस्ट बरीच व्हायरल झाली असून या पोस्टवर प्रतिक्रियांचा पाऊस पडताना दिसतोय. सैन्य दलाने या सरावाबाबत बोलताना सांगितले की  

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com