Kalyan News : कल्याणमध्ये अतिशय धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर दोघांनी लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणात कोळसेवाडी पोलिसांनी अख्तर मनियार आणि सलीम शेख या दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. विशेष म्हणजे हे दोघे ६० वर्षांचे आहेत.
घरभर रक्त पसरलेलं...
कल्याण पूर्व येथील कोळसेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली. येथील एका घरातून एका १५ वर्षांच्या मुलीचा आरडाओरडा ऐकू येत होता. मुलीचा ओरडाओरड सुरू असताना आजूबाजूला राहणाऱ्या लोकांना जाग आली. लोकांनी याबाबत कोळसेवाडी पोलिसांना माहिती दिली. पोलीस घटना स्थळी दाखल झाले. या प्रकरणात पोलिसांकडून कोणतीही माहिती अद्याप देण्यात आलेली नाही. मात्र पोलीस सूत्रांकडून आलेली माहिती अतिशय धक्कादायक आहे. आरोपींमध्ये अख्तर मणियार आणि सलीम शेख यांची नावं समोर आली आहे. ही दोघे रात्रीच्या वेळी एक पंधरा वर्षांच्या मुलाला घरात घेऊन आले होते. घरातच तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची माहिती आहे. ही मुलगी गरीब कुटुंबातील असल्याचं सांगितलं जात आहे.
घरामध्ये शरीर विक्रीचा प्रकार?
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी मणियार हा एपीएमसी मार्केटमध्ये चहा विक्रीच्या व्यवसाय करतो . तर सलीम हा रिक्षा चालक आहे. मुलगी गरीब घराची आहे. तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. मणियार हा नेहमी विविध लोकांना या घरात घेऊन येतो. त्याच्यासोबत अनेकदा मुलीदेखील असतात. या घराचा मालक मुंबईत राहत असून केवळ घराचं भाडं घेण्यासाठी कल्याणमध्ये येतो. आता या प्रकरणात अख्तर मणियार आणि सलीम शेख या दोघांना अटक करण्यात आली आहे.अख्तर मणियार याने याआधी या मुलीसोबत किंवा इतर मुलींसोबत असा प्रकार केला आहे का? या प्रकारात किती लोक आहेत? याचा तपास आता पोलीस करीत आहेत. मात्र या घटनेमुळे कल्याणमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world