जाहिरात

Kalyan News: स्मार्ट सिटी कल्याण? नागरीकांना मिळतं फक्त 15 मिनिटं पाणी, पैसे मोजून भागवावी लागते तहान

पाणी येत नसल्याने घरची कामे कशी करायची. टँकर मागवून आम्हाला आमची तहान भागवावी लागते असं इथल्या महिलांनी सांगितलं.

Kalyan News: स्मार्ट सिटी कल्याण? नागरीकांना मिळतं फक्त 15 मिनिटं पाणी, पैसे मोजून भागवावी लागते तहान
कल्याण:

अमजद खान 

कल्याण शहरात मेट्रो येत आहे. स्मार्ट सिटी प्रकल्प सुरु आहे. शहराचा चेहरामोहरा बदलण्याचं सांगितलं जात आहे. असं असलं तरी या शहरात अजूनही पिण्याच्या पाण्याची वानवा आहे. अनेक भागात पाणी अजून ही मिळत नाही. त्यामुळे पैसे मोजून टँकरने पाणी घेतल्या शिवाय त्यांना कोणता पर्याय राहीलेला नाही. महापालिकेचे सर्व कर भरून ही या नागरिकांच्या नशिबी पिण्याचे पाणी नाही अशी म्हणण्याची वेळ आली आहे. तरी आता डिसेंबर महिना सुरू आहे. मे महिन्यात काय परिस्थितीत ओढवेल याची कल्पनाच न केलेली बरी असं इथले रहिवाशी आता म्हणत आहे.  

कल्याण शहरात  देशमुख होम्स ही इमारत आहे. या इमारतीतील नागरीकांना पाणी टंचाईची समस्या भेडसावत आहे. घरातील नळाला केवळ पंधरा मिनिटे पाणी येते. 6 व्या आणि 7 व्या मजल्यावर तर पाणी पोहचतच नाही. त्यात लाईट गेली तर पाण्याचा एक थेंब सुद्धा मिळत नाही अशी व्यथा देशमुख होम्समधील महिलांनी मांडल्या आहेत. या व्यथा ऐकताच केडीएमसीचे माजी नगरसेवक कुणाल पाटील यांनी थेट कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे  यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी देशमुख होम्समधील पाणी समस्येची माहिती त्यांनी दिली. त्यावर हा प्रश्न सोडवू असं आश्वासन देण्यात आलं आहे. 

नक्की वाचा - Pankaja Munde PA: पत्नीच्या आत्महत्येनंतर अनंत गर्जेचा पहिला फोन पंकजा मुंडेंना, चर्चा काय झाली?

कल्याण पूर्वेतील देशमुख होम्समधील सिद्धीविनायक रेसिडेन्सीमधील नागरीकांनी माजी नगरसेवक कुणाल पाटील यांच्यासोबत एका बैठकीचे आयोजन केले हेाते. या बैठकीत नागरीकांनी त्यांच्या सोसायटीला सगळ्यात जास्त पाणी टंचाईची समस्या भेडसावत आहे असं सांगितलं. विशेषत: महिला वर्गाने पाणी टंचाई व्यथा मांडली. महिलांनी सांगितले की, सोसायटीला पाणी येत नाही. केवळ पंधरा मिनिटेच पाणी मिळते. सहाव्या आणि सातव्या मजल्यावर पाणी पोहचत नाही. त्यात लाईट गेली तर अजिबात पाणी मिळत नाही. 

नक्की वाचा - D Mart News: डी मार्टमध्ये 'या' दिवशी मिळतं सर्वात स्वस्त सामान, त्यामागचं कारणं ऐकून तुम्ही ही खूश व्हाल

घरची कामे तशीच राहतात. त्यात काही महिला या नोकरी करणाऱ्या आहेत. पाणी येत नसल्याने घरची कामे कशी करायची. टँकर मागवून आम्हाला आमची तहान भागवावी लागते. टँकरचा खर्च सगळ्यांनाच परवडणारा नाही. या व्यथा ऐकताच माजी नगरसेवक पाटील यांनी थेट खासदार शिंदे यांच्याशी संपर्क साधला. खासदार शिंदे यांनी देशमुख होम्समधील पाणी समस्या तातडीने सोडविली जाईल असे आश्वासन दिले. त्याकरीता तातडीने बैठक घेतली जाईल, अशीमाहिती माजी नगरसेवक पाटील यांनी उपस्थित नागरीकांना यावेळी दिली.

नक्की वाचा - आई वडिलांचे अश्रू, निष्पाप मुलीची आर्त हाक अन् वैमानिक पत्नी! शहीद नमांश यांच्या निरोपाचे चित्र तुम्हाला रडवेल

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com