गणेशोत्सव उत्साहात साजरा झाला. या दहा दिवसाच्या काळात लालबागच्या राजाच्या चरणी भाविकांनी भरभरून दान टाकल्याचे समोर आले आहे. या कालावधीत तब्बल 8 कोटींचे दान राजाच्या चरणी देण्यात आलं आहे. यात गणेशोत्सव काळात 5 कोटी 65 लाख रूपये जमा झाले आहेत. तर लिलावातून झालेली कमाई ही 2 कोटी 3 लाख ऐवढी आहे. यावेळी लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक आले होते. लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी देशभरातून भाविक येत असतात. शिवाय अनेक जण बाप्पाच्या चरणी दान टाकत असतात.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
यावेळी गणेशोत्सवाच्या काळात दान पेटील तब्बल 5 कोटी 65 लाख रूपये जमा झाले आहेत. दान पेटी शिवाय अनेक भक्त सोने -चांदी याचे अलंकार देत असतात. काही मौल्यवान भेट वस्तू ही देत असतात. या वस्तूंचा गणेश विसर्जनानंतर लिलाव केला जातो. सर्वाधिक बोली लावणाऱ्या व्यक्तीला या वस्तू दिल्या जातात. यावेळी सर्वाधिक बोली ही सोन्याच्या वीटेला लावण्यात आली आहे.
ट्रेंडिंग बातमी - केंद्रीय निवडणूक आयोगाचा मुंबई दौरा, विधानसभा निवडणूकीची घोषणा कधी?
सर्वाधिक बोली लागलेली वीट हे जवळपास 1 किलो वजनाची आहे. त्यासाठी तब्बल 76 लाख रूपयांची बोली लागली. त्यानंतर ही वीट त्या भाविकांने घेतली. त्याच बरोबर सोन्याच्या नेकलेसचाही लिलाव यावेळी करण्यात आला. त्यासाठी लागलेली बोली ही 74 लाख रूपये होती. या दोन बोली यावेळच्या सर्वोच्च बोली होत्या. त्यातून मंडळाच्या खजिन्यात पैशांची भर पडली आहे. या वस्तू त्या भक्तांना त्याच वेळी देण्यात आल्या.
ट्रेंडिंग बातमी - 'सुप्रिया सुळे भावी मुख्यमंत्री', बारामतीतील बॅनरची राज्यभर चर्चा
या दोन मौल्यवान वस्तू शिवाय इतर दागिन्यांचाही लिलाव यावेळी करण्यात आला. बाप्पाच्या चरणी यावेळी सोन्याचं 4.15 किलोचं दान पडलं होतं. येवढे सोन्याचे दागिने बाप्पाला अर्पण करण्यात आले होते. तर तब्बल 64 किलो चांदीचं दान बाप्पाच्या चरणी अर्पण केल्याची माहिती समोर आली आहे. लालबाच्या राजाच्या उत्सव दहा दिवस चालला. या उत्सवात सेलिब्रेटींपासून ते अगदी सर्व सामान्य माणसांपर्यंत सर्वांनीच सहभाग नोंदवत बाप्पाचं दर्शन घेतलं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world