विधानसभा निवडणुकीतील अपयशानंतर उद्धव ठाकरे मुंबई महापालिकेच्या तयारीला लागले आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी वॉर्डनिहाय आढावा उद्धव ठाकरे घेणार आहेत. मुंबईतील विभागप्रमुख, उपविभाग प्रमुख, शाखाप्रमुख आणि पदाधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचे आदेश मातोश्रीवरुन देण्यात आले आहेत.
सतीश वाघ हत्या प्रकरणात त्यांच्या पत्नी मोहिनी वाघ यांच्यासह पाच जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. सतीश वाघ यांच्या हत्येची सुपारी त्यांची पत्नी मोहिनी वाघ यांनीच दिली होती हे पोलिसांच्या तपासातून उघड झालं असून शेजारी राहणाऱ्या अक्षय जावळकर या तरुणासोबत त्यांचे प्रेमसंबंध होते. त्यातूनच त्यांनी सतीश वाघ यांच्या हत्येचा प्लान आखल्याची माहिती आहे.
Live Update : कर्नाटकातील काँग्रेसची रॅली रद्द, राहुल गांधी दिल्लीला परतणार असल्याची माहिती...
कर्नाटकातील काँग्रेसची रॅली रद्द, राहुल गांधी दिल्लीला परतणार असल्याची माहिती...
Live Update : माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग हॉस्पिटलमध्ये दाखल
Live Update : माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. दिल्लीतील एम्स हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यात आलं आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
Live Update : अयोध्येतून परतत असताना अकोल्यात खासगी बस नदीत कोसळली...
अकोल्यात खासगी बस नदीत कोसळली...
बसमधील ५० प्रवासी सुखरुप असल्याची माहिती
अयोध्येहून वाशिमला परतत असताना हा अपघात झाला.
Live Update : येवल्यात आज पुन्हा नायलॉन मांज्याने चिमुकला जखमी, हाताला 18 टाके पडले
येवल्यात आज पुन्हा नायलॉन मांज्याने चिमुकला जखमी...
नऊ वर्षीय यशराज चव्हाण याचा कापला हात...
हाताला 18 टाके पडले, जखमी यशराजवर रुग्णालयात उपचार सुरू...
येवल्यातील अंगणगावातील घटना....
नायलॉन मांजाने पंधरा दिवसांत 5 जण जखमी...
येवल्यात नायलॉन मांजाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर...
नायलॉन मांजा विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी....
Live Update : परतूर येथील बागेश्वरी साखर कारखान्यात स्फोट, दोन कामगारांचा मृत्यू
परतूर येथील बागेश्वरी साखर कारखान्यात स्फोट, दोन कामगारांचा मृत्यू
या स्फोटात दोघांचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर झाल्याची माहिती आहे. जखमींना परतूर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.
Live Update : चित्रपट चित्रिकरणाच्या परवानगीसाठी संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक खिडकी योजना सुरू करा !
चित्रपट निर्मिती उद्योगाला चालना मिळावी, महाराष्ट्रात जास्तीत जास्त चित्रपटांंची निर्मिती व्हावी आणि त्यातून जास्तीत जास्त रोजगार उपलब्ध व्हावा, चित्रपट निर्मात्यांना चित्रिकरणाच्या परवानग्या मिळणे सुलभ व्हावे आणि सुसुत्रता असावी यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात एक खिडकी योजना लागू करा, असे निर्देश सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी आज विभागाला दिले.
Live Update : पंचवटी अग्निशामक दलाच्या जवानाने वाचवले एका कोकिळेचे प्राण..
पंचवटीतील मेहेरधाम येथे एका झाडाला नायलॉन मांजात अडकलेली कोकिळा पक्षी तडफडत असताना अग्निशामक दलाचे जवानांना फोन आला. त्यांनी वेळीच या कोकिळेचे प्राण वाचण्यासाठी प्रयत्न केले. या कोकिळेच्या शरीराला नॉयलान मांजा लटकलेला होता. कोकिळेचे प्राण वेळीच वाचवल्याने अग्निशामक दलाच्या जवानांचे परिसरातील नागरिकांनी कौतुक केले. मात्र शहरात सर्रासपणे आजही नायलॉन मांजा विक्री होत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
Live Update : शहीद जवान शुभम घाडगे यांच्या पार्थिवावर कामेरी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
शहीद वीर जवान शुभम घाडगे यांच्या पार्थिवावर आज सातारा तालुक्यातील कामेरी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. शहीद जवान शुभम घाडगे यांचे पार्थिव कामेरी गावी आल्यानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्र सिंहराजे भोसले व मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.
Live Update : हवेत गोळीबार करून व्हिडिओ काढणाऱ्या कैलास फडला अटक
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांचा कार्यकर्ता कैलास फड याचा हवेत गोळीबार करतानाचा व्हिडिओ अंजली दमानिया यांनी ट्विट केला होता. या व्हिडिओच्या आधारे पोलिसांनी परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. आता हाच कैलास फडला परळी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
शस्त्रपूजा केल्यानंतर फडने हवेत गोळीबार केला होता. हा व्हिडिओ जुना असला तरी आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याच आधारावर पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानुसार परळी शहर पोलीस ठाण्यात कैलास फड याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता
Live Update : कल्याण प्रकरणात ठाकरे गटाचा पोलीस स्टेशनवर निषेध मोर्चा
कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार हत्या प्रकरणात ठाकरे गटाचा पोलीस स्टेशनवर निषेध मोर्चा
ठाकरे गटाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात घोषणाबाजी
मोर्चा कोळशेवाडी पोलीस ठाण्यावर धडकणार
Live Update : पीक विमा घोटाळ्याबाबत धक्कादायक माहिती समोर
पीक विमा घोटाळ्याबाबत धक्कादायक माहिती समोर
राज्यात पीक विमा घोटाळ्याचा आकडा पोहोचला 3 लाख 32 हजारांवर
3 लाख 32 हजार बोगस प्रस्ताव शोधण्यात कृषी विभागाला यश
2024-25 मधील पीक वर्षात विम्यासाठी एकूण दोन कोटी 11 लाख अर्ज
सर्व संशयास्पद पीक विमा प्रस्ताव शासनाकडून रद्द
एक रुपयात पीकविमा सुरू झाल्यापासून पीक विमा घोटाळे वाढले
Live Update : नाशिकच्या महानगरपालिकेच्या आयुक्तपदी आता मनीषा खत्री यांच्या नियुक्तीचे आदेश..
नाशिकच्या महानगरपालिकेच्या आयुक्तपदी आता मनीषा खत्री यांच्या नियुक्तीचे आदेश..
24 तासापूर्वी वर्धा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांना ही जबाबदारी झाली होती जाहीर
24 तासात महानगरपालिका आयुक्तांच्या आदेशामध्ये बदल
पालकमंत्री गिरीश महाजन यांची होती नियुक्तीवरून नाराजी
नाराजीची दखल घेत आज अचानक मनीषा खत्री यांची नियुक्ती केल्याची चर्चा..
मनीषा खत्री या नाशिक जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या पत्नी.
Live Update : इंडिया आघाडीतून काँग्रेसची हकालपट्टी करा, आपची मागणी
इंडिया आघाडीतून काँग्रेसची हकालपट्टी करावी अशी मागणी आज केजरीवालांच्या आपनं केलीय. पुढच्या वर्षभरात दिल्ली विधानसभेच्या निवडणुका आहेत. ह्या निवडणुका आप आणि काँग्रेसनं स्वतंत्र लढवण्याची घोषणा केलीय. त्यामुळे काँग्रेसनं आक्रमक होत केजरीवालांच्या आपला टार्गेट केलंय. दिल्लीत आप काही प्रमाणात का होईना घसरत असल्याचा काँग्रेसचा अंदाज आहे. ती जागा भरुन काढण्यासाठी काँग्रेसनं दिग्गजांना मैदानात उतरवलंय. त्याचाच एक भाग म्हणून माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचा मुलगा संदीप दीक्षित यांना केजरीवालांच्याविरोधात मैदानात उतरवलंय. त्याचाच परिणाम म्हणून सध्या आपच्या टार्गेटवर भाजपपेक्षाही काँग्रेस असल्याचं दिसतंय. त्यामुळेच इंडिया आघाडीतून काँग्रेसची हकालपट्टी करावी अशी मागणी केजरीवालांचे नेते करतायत.
Live Update : जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक मिळावा यासाठी पालकाचे आमरण उपोषण..
अकोला जिल्ह्यातल्या अकोट तालुक्यातील वरुर येथील जिल्हा परिषद शाळेवर गेल्या चार ते पाच वर्षापासून इंग्रजी शिक्षक नसल्यामुळे या ठिकाणी विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे या शाळेला शिक्षक मिळावा त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर नितीन घनबहादुर या पालकाने जिल्हाधिकारी कार्यासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. माझ्या एका मुलीचे नुकसान झाले आहे... तर दुसऱ्या मुलीचे नुकसान होऊ नये म्हणून हे आमरण उपोषण सुरू केले आहे... जोपर्यंत या शाळेला शिक्षक देत नाही तोपर्यंत इथून उठणार नसल्याचा इशारा या ठिकाणी उपोषण करते नितीन घनबहादूर यांनी दिला आहे....!
Live Update : कल्याणमधील पीडित मुलीच्या अंत्ययात्रेदरम्यान नागरिकांची जोरदार घोषणाबाजी
कल्याणमधील पीडित मुलीच्या अंत्ययात्रेदरम्यान नागरिकांची जोरदार घोषणाबाजी
मुख्यमंत्र्याविरोधात घोषणाबाजी
नराधम विशाल गवळीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी
Live Update : कुख्यात गुन्हेगार 'आटल्या' अखेर सिंधुदुर्ग पोलिसांच्या ताब्यात
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध भागात घरपोडी व इतर गुन्ह्यातील आरोपी असलेल्या अट्टल गुन्हेगारास सिंधुदुर्ग पोलिसांनी अहिल्यानगर जिल्ह्यातून शिताफीने अटक केली आहे. आटल्या उर्फ अतुल ईश्वर भोसले असं त्याचं नाव आहे. या कुख्यात गुन्हेगारावर महाराष्ट्रातील विविध पोलीस ठाण्यात 47 गुन्हे दाखल असून खून, बलात्कार, दरोडा, सरकारी नोकरांवर खुनी हल्ला, घरफोडी, जबरी चोरी अशा स्वरूपाचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. हा आरोपी वारंवार आपल्या राहण्याची ठिकाणं बदलत होता. तो पोलिसांना चकवा देत होता. सिंधुदुर्ग पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व कणकवली पोलिसांच्या पथकाने अहिल्यानगर जिल्ह्यातून त्याला अटक केली असून कणकवली पोलिसांच्या ताब्यात आरोपीला देण्यात आले आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे PM नरेंद्र मोदींच्या भेटीला, दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल एक तास चर्चा
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत तब्बल एक तास झाली चर्चा
१२ वाजता पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानातून शिंदे कुटुंबीय बाहेर निघाले
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीला शिंदे कुटुंबिय पोहोचले.
अमित शाह यांच्यासोबत होणार बैठक
कल्याण अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि हत्या प्रकरण, दोन्ही आरोपींना 2 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी
कल्याण अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि हत्या प्रकरण
आरोपी विशाल गवळी आणि पत्नीला 2 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी
कल्याण कोर्टाकडून दोन्ही आरोपींना पोलीस कोठडी
जम्मू-कश्मीरमधील पूंछमध्ये साताऱ्याचे सुपूत्र शुभम घाडगे शहीत, लष्कराच्या वाहनाला झाला होता अपघात
जम्मू कश्मीरमधील पूंछ भागातील नियंत्रण रेषेजवळ बलनोई परिसरात मंगळवारी संध्याकाळी भारतीय लष्कराचे वाहन खोल दरीत कोसळून झालेल्या अपघातात 5 जवान शहीद झाले. त्यामध्ये 11 मराठा रेजिमेंटमध्ये देशसेवा करणारे कामेरी, सातारा गावचे सुपूत्र शुभम समाधान घाडगे वय 28 हे देशसेवा बजावत असताना शहीद झाले
महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त राहुल कर्डिले यांच्या नियुक्तीला ब्रेक?
महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त राहुल कर्डिले यांच्या नियुक्तीला ब्रेक?
कर्डिले यांची नियुक्ती झाल्याने भाजप नेते गिरीश महाजन नाराज असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा
राहुल कर्डिले यांची दोनच दिवसांपूर्वी वर्ध्याच्या जिल्हाधिकारी पदावरून नाशिक महापालिका आयुक्तपदी करण्यात आली होती बदली
मनीषा खत्री यांना नियुक्ती मिळावी यासाठी गिरीश महाजन होते प्रयत्नशील
गिरीश महाजन कुंभमेळा मंत्री असून आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आपल्या मर्जीतील अधिकाऱ्यासाठी महाजनांची फिल्डिंग
- राहुल कर्डिले सध्या मसुरीला प्रशिक्षणासाठी झाले आहेत रवाना
निकृष्ट दर्जाचे काँक्रिट रोड बांधल्याने कंत्राटदारांला पालिकेच्या वतीने ५० लाखांचा दंड
निकृष्ट दर्जाचे काँक्रिट रोड बांधल्याने कंत्राटदारांला पालिकेच्या वतीने ५० लाखांचा दंड
रस्त्यांची देखरेख ठेवण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या कमिटीने योग्य काम न केल्याने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे आणि दंड ठोठावला आहे
पालिकेच्या वतीने कॅालिटीचेकसाठी कठोर कारवाई करण्यात आली
कांद्याच्या दरात 15 दिवसात 40 ते 50 टक्क्यांची घसरण, शेतकऱ्यांचे जवळपास 500 कोटींचे नुकसान
कांद्याच्या दरात गेल्या 15 दिवसात 40 ते 50 टक्क्यांची घसरण
15 दिवसांपूर्वी सरासरी साडेतीन ते 4 हजार रुपये मिळत होता भाव
आज हेच दर 2 ते अडीच हजारांवर आल्याने कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत
राज्यातील शेतकऱ्यांचे जवळपास 500 कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज
राज्यातील बाजारपेठामध्ये अडीच लाख टन कांदा विक्रीस झाला होता दाखल
ईतर राज्यातूनही कांद्याची आवक वाढली यासबतच 20 टक्के निर्यातशुल्कमुळे शेतकऱ्यांना बसतोय फटका
केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल उद्या नाशिक दौऱ्यावर असून निर्यातशुल्क बाबत ते काही निर्णय घेणार का ? हे बघणं महत्वाचे
कल्याण न्यायालयाच्या आवारात निषकळजीपणा केल्या प्रकरणी 11 पोलीस निलंबित
कल्याण न्यायालयाच्या आवारात निषकळजीपणा केल्या प्रकरणी 11 पोलीस निलंबित
कल्याण न्यायालयात न्यायाधीशावर एका कैदीने चप्पल भिरकावली होती
तर दुसऱ्या घटनेत एक इसम बंदूक घेऊन कल्याण न्यायालयाच्या आवारात फिरत होता
या दोन्ही प्रकरणाचे गंभीर दखल घेत मुख्यालय आणि कल्याणच्या डीसीपीनी केली निलंबनाची कारवाई
पुण्यात धावत्या चारचाकी गाडीने घेतला पेट, मुंबई-बेंगलोर हायवेवरील चांदणी चौकातील घटना
पुण्यात धावत्या चारचाकी गाडीने घेतला पेट, मुंबई-बेंगलोर हायवेवरील चांदणी चौकातील घटना
सुदैवानं आगीत कुणीही जखमी नाही, आगीत कुठलीही जीवितहानी नाही
कार चालकाच्या माहितीअनुसार गाडी चालवत असताना मागून एका ट्रकने धडक दिली आणि गाडी थोडी पुढे जाताच गाडीने पेट घेतला
हँड ब्रेक लावला नसल्याने रस्त्याच्या डावीकडे असलेली गाडी उजवीकडे असलेल्या डिव्हायडरला धडकली
काँग्रेस पक्षाच्या वर्किंग कमिटीची आज दिल्लीत बैठक
काँग्रेस पक्षाच्या वर्किंग कमिटीची आज दिल्लीत बैठक
100 वर्षांपूर्वी बेळगाव येथे काँग्रेसचं अधिवेशन पार पडलं होतं, या अधिवेशनात महात्मा गांधी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष बनले होते
आज जी बैठक पार पडणार आहे त्याला नवं सत्याग्रह असं नाव देण्यात आलं आहे
त्याच ठिकाणी आज वर्किंग कमिटीची बैठक पार पडणार आहे
आज आणि उद्या असे दोन दिवस या बैठका पार पडणार आहेत
अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर वर्किंग कमिटी बैठक पार पडणार आहे
पुण्यातील मुळा, मुठा नदीत असलेल्या दुषित पाण्यामुळे हजारो माशांचा मृत्यू
पुण्यातील मुळा, मुठा नदीत असलेल्या दुषित पाण्यामुळे हजारो माशांचा मृत्यू
मुळा, मुठा नदीमध्ये रसायनमिश्रीत दुषित पाणी आल्याने हजारो माशांचा मृत्यू झाला
महापालिकेने याठिकाणच्या पाण्याचे नमुने प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठवले
दुषित पाणी कुठून आले याचा शोध सुरु आहे
अमरावतीच्या ईरविन चौकातल्या स्पा सेंटरवर नागरिकांकडून धाड
अमरावतीच्या ईरविन चौकातल्या स्पा सेंटरवर नागरिकांकडून धाड
स्पा सेंटरच्या आडून देहविक्रीचा व्यवसाय चालत असल्याचा संशय
गोंधळानंतर घटनास्थळावर पोलिसांना पाचारण
एका व्यक्तीला घेतले ताब्यात, पोलिसांकडून चौकशी सुरू
Beed News : बीड जिल्ह्यात 1281 शस्त्र परवानेधारकांपैकी 245 जणांवर गुन्हे दाखल
बीड जिल्ह्यात सध्या 1281 जणांकडे शस्त्र परवाना आहे. बीड जिल्ह्याचे तत्कालीन पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी कमीत कमी 1 आणि जास्तीत जास्त 16 गुन्हे दाखल असलेल्या 245 जणांची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना ऑक्टोबरमध्ये पाठवली होती. आता डिसेंबर संपत आला तरी देखील जिल्हाधिकाऱ्यांकडून यावर काहीच कारवाई झालेली नाही. त्यामुळे हे लोक आज बंदूक घेऊन फिरताना दिसत आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी 295 शस्त्र परवाने देखील नाकारले होते, हे प्रस्ताव ऑगस्ट 2023 पूर्वीचे असल्याचे सांगण्यात आले होते. त्यातच 245 प्रस्तावांवर निर्णय घेतला नसल्याची ही माहिती समोर आली आहे.