त्रिशरण मोहगावकर, लातूर
पैशांअभावी स्वत:ला औताला जुंपल्याचा लातूरमधील वृद्ध दाम्पत्याचा व्हिडीओ समोर आला होता. लातूर जिल्ह्यातील हडोळती अहमदपुर येथील शेतकरी अंबादास गोविंद पवार यांच्यावर ही परिस्थिती ओढावली आहे. मात्र व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी स्वत: अंबादास पवार यांच्याशी फोनवरून संवाद साधला. विधानसभा अधिवेशनातही या घटनेचे पडसाद उमटले.
सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, अभिनेता सोनू सूद देखील या वृद्ध दाम्पत्याच्या मदतीसाठी पुढे आला आहे. सोनू सूदने सोशल मीडियावर पोस्टवर लिहिले की, "तुम्ही त्यांचा नंबर पाठवा, आम्ही त्यांच्यासाठी बैलाची व्यवस्था करू." आता स्थानिक प्रशासन देखील सक्रिय झाले असून मदतीसाठी वृद्ध दाम्पत्यापर्यंत पोहोचले आहे.

(नक्की वाचा- Farmer News: हृदयद्रावक! पाच महिन्यापूर्वी पित्याची आत्महत्या, त्याच कर्जाने शेतकरी पुत्राचा जीव घेतला!)
प्रशासन ट्रॅक्टर आणि सव्वा लाख देणार
कृषी अधिकारी सचिन बावगे म्हणाले की, त्यांच्याकडे कृषी ओळखपत्र नव्हते आणि म्हणून सह कृषी अधिकाऱ्यांनी ओळखपत्र बनवण्याची प्रक्रिया सुरू केली. लवकरच, त्यांना विभागाकडून ट्रॅक्टर आणि 1.25 लाख रुपये यासह सर्व उपकरणे मिळतील. कारण सरकारी तरतुदीनुसार 5 बिघापेक्षा कमी जमीन असलेल्यांसाठी हे बंधनकारक आहे.
#WATCH | Taluka Agriculture Officer Sachin Bavge says, "Ambadas Pawar has 4 bighas of land, which is dependent on rain for irrigation... Our team of officers visited and found that he lacked the necessary equipment. So, we told him about all the equipment available at subsidized… https://t.co/Ipi3k80XdM pic.twitter.com/xnlz3v1SLm
— ANI (@ANI) July 2, 2025
काय आहे घटना?
शेतातील सोयाबीन व कपाशीसाठी आंतर मशागत करण्यासाठी पैसे नसल्यामुळे अंबादास पवार आणि त्याच्या पत्नी मुक्ताबाई पवार यांच्यावर स्वतःला औताला जुंपण्याची वेळ आली. अंबादास पवार यांची थोडी जमीन गावात आहे. या जमीनीवरच त्यांची उपजिविका ते भागवत असतात. पत्नी मुक्ताबाई पवार, एक मुलगा पुण्याला कामाला असतो. सून, एक नातू व एक नात यांचा शिक्षणाचा खर्च, घर प्रपंच या शेतीवरच अवलंबून आहे. त्यामुळे उत्पन्न कमी आणि खर्च जास्त स्थिती त्यांची आहे.
(नक्की वाचा - Pratap Sarnaik: परिवहन मंत्र्यांनी Rapido बुक केली, राईड येताच रंगेहाथ पकडले)
अशात कपाशिच्या पिकात कोळपणी करण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते. घरचे बैल नाही, तर 2500 रूपये एवढी महागडी रोजदांरी परवडणारी नाही. म्हणून वयाची पंच्याहत्तरी गाठलेल्या अंबादास पवार यांनी स्वतःला औताला जुंपून घेत कोळपणीची कामे पत्नी मुक्ताबाई पवार यांच्या मदतीन गेल्या दहा वर्षांपासून करून घेतात . कोळपणी करताना वयाची आंबादास पवार यांच्या अंगातून घामाचा धारा वाहत होत्या. आराम करण्याच्या वयात मानेवर जू पाहून पाहणाऱ्याच्या डोळ्यात येत होते.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world