Live News Update : विधिमंडळ अधिवेशनाचा आजचा पाचवा दिवस आहे. कालपासून विधिमंडळाच्या नियोजित कामकाजाला सुरुवात झाली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज राज्यपालांच्या अभिभाषनाला उत्तर देतील. तसेच अर्थसंकल्पामधील पुरवणी मागण्यांवर देखील आज चर्चा होणार. या चर्चेचा आजचा शेवटचा दिवस असणार आहे. तर आज राज्याचे अर्थमंत्री अजित पवार हे 2024 2025 या वर्षाचा आर्थिक पाहणी अहवाल पटलावर ठेवतील.
केडीएमसीने केलेली एम डी पॅथॉलॉजी या पदाची तात्पुरती नियुक्ती वादाच्या भोवऱ्यात ?
कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या आरोग्य विभागात एम डी पॅथॉलॉजी या पदावर केडीएमसीच्या अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांच्या पत्नीची कंत्राट पद्धतीवर तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती करण्यात आली. या नियुक्तीमुळे केडीएमसी पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. ही नियुक्ती कंत्राटी पद्धतीने झाली आहे. असं असताना अवघ्या 24 तासात अतिरिक्त आयुक्त गायकवाड यांची पत्नी डॉ श्रुती कोनाले यांची नियुक्ती केडीएमसी वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. नियुक्ती प्रकियेचे नियम डावलून ही प्रक्रिया केल्याचा आरोप करण्यात येतोय. याबाबत केडीएमसीच्या उपायुक्त वंदना गुळवे यांनी सांगितले की , केडीएमसीला एम सी पॅथॉलॉजी डॉक्टरची गरज होती. कोव्हिड नंतर नियुक्त केलेल्या अनेक डॉक्टरांनी राजीनामा दिला. डॉक्टरांची कमतरता असल्याने हा निर्णय घेतला आहे. नियुक्ती प्रक्रिया बेकायदेशीर नाही, ही तात्पुरती नियुक्ती करण्यात आली आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.
पाच वर्षाच्या मुलावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला ; शरीराचे लचके तोडून केले ठार
काळजाचा थरकाप उडवणारी घटना नाशिकच्या येवला तालुक्यातील ममदापूर या ठिकाणी घडली आहे. पाच वर्षाचा श्याम ममराज राठोड हा चिमूरडा शाळेतून घरी परतत होता. शेतातून जात असताना पाठीमागून आलेल्या पाच ते सहा भटक्या कुत्र्यांनी या चिमुरड्यावर हल्ला केला. त्याचे लचके तोडले. यावेळी या मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात हा चिमुरडा जागीच ठार झाला.
Beed Crime: महादेव मुंडे हत्या प्रकरण: वाल्मीक कराडच्या निकटवर्तीयाची कसून चौकशी
महादेव मुंडे खून प्रकरणात वाल्मीक कराडच्या निकटवर्तीयाची कसून चौकशी
वाल्मीक कराडचा निकटवर्तीय श्रीकृष्ण उर्फ भावड्या कराड याची दीड तास विशेष पथकाकडून चौकशी झाली
महादेव मुंडे यांचा खून प्लॉटिंगच्या व्यवहारातून झाल्याचा संशय त्यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी व्यक्त केला होता
त्यामुळे या प्रकरणात श्रीकृष्ण उर्फ भावड्या कराडचा काही संबंध आहे का? हे तपासले जात आहे
पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी स्थापन केलेल्या पथकाने ही चौकशी केली आहे
आतापर्यंत विशेष पथकाकडून महादेव मुंडे खून प्रकरणात 15 मुख्य संशयीतांची चौकशी झाली आहे
श्रीकृष्ण उर्फ भावड्या कराड परळी नगर परिषदेचे माजी पाणीपुरवठा सभापती आहे
Beed Crime: महादेव मुंडे हत्या प्रकरण: वाल्मीक कराडच्या निकटवर्तीयाची कसून चौकशी
महादेव मुंडे खून प्रकरणात वाल्मीक कराडच्या निकटवर्तीयाची कसून चौकशी
वाल्मीक कराडचा निकटवर्तीय श्रीकृष्ण उर्फ भावड्या कराड याची दीड तास विशेष पथकाकडून चौकशी झाली
महादेव मुंडे यांचा खून प्लॉटिंगच्या व्यवहारातून झाल्याचा संशय त्यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी व्यक्त केला होता
त्यामुळे या प्रकरणात श्रीकृष्ण उर्फ भावड्या कराडचा काही संबंध आहे का? हे तपासले जात आहे
पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी स्थापन केलेल्या पथकाने ही चौकशी केली आहे
आतापर्यंत विशेष पथकाकडून महादेव मुंडे खून प्रकरणात 15 मुख्य संशयीतांची चौकशी झाली आहे
श्रीकृष्ण उर्फ भावड्या कराड परळी नगर परिषदेचे माजी पाणीपुरवठा सभापती आहे
IT Raid: पार्ले- जी कंपनी आयकर विभागाच्या रडारवर, मुुंबईतील कार्यालयावर छापेमारी
पार्ले प्रॉडक्ट्स कंपनीवर आयकर विभागाच्या धाडी
आयकर विभागाच्या फॉरेन ॲसेट युनिट ने टाकल्या धाडी
पार्ले कंपनीच्या मुंबईतील कार्यालयावर आयकर विभागाची शोध मोहीम
Satara: साताऱ्यात भाजप महिला आघाडीकडून जिल्हाधिकाऱ्यांना घेराव
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर एका महिलेने गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांचे पडसाद विधान भवनामध्ये सुद्धा उमटताना पाहायला मिळाले. या आरोपांबाबत सातारा जिल्ह्यातील भाजपची महिला आघाडी आता आक्रमक झाली असून. आज साताऱ्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांना भाजपा महिला आघाडीने घेराव घालून जयकुमार गोरे यांची बदनामी थांबवावी आणि संबंधित महिलेवर कडक कारवाई करण्यात यावी याबाबतचे निवेदन दिले.
Swargate Rape Case: दत्ता गाडेच्या मोबाईलचा तपास, पुणे पोलिसांची टीम गुनाट गावात
पुणे स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेचा त्याच्या गुणात गावात शोध घेतल्यानंतर पुणे पोलिसांच्या क्राइम ब्रांच कडून त्याच्या गुन गावात आता दत्ता गाडे च्या मोबाईलचा शोध घेतला जाणार.... दत्ता गाडे ज्या ज्या शेतशिवारात फिरला ते सर्व शेत शिवार शोधून पोलीस दत्ता गाडेचा मोबाईल शोधणार....दत्ता गाडेच्या मोबाईल मधून अनेक महत्त्वाचे पुरावे हाती येण्याची शक्यता असल्याने या अनुषंगाने पुणे पोलिसांकडून दत्ता गाडेच्या मोबाईलचा शोध गुनाट गावात घेतला जाणार... पुणे पोलिसांच्या 20 जणांची टीम गुनाट गावात दत्ता गाडेच्या मोबाईलच्या शोधासाठी येणार...
Jalna News: धक्कादायक! महिला तहसीलदारावर वाळूमाफियांचा हल्ला
जालन्यातील परतूर येथे वाळूमाफीयाने महिला तहसीलदारवर हल्ला केलाय..परतूर येथील दुधना नदी पात्रात अवैध वाळूचं उत्खनन करणाऱ्यावर रात्री कारवाईसाठी गेलेल्या महिला तहसीलदारावर हल्ला करण्यात आला आहे.. प्रतिभा गोरे असं या तहसीलदाराचं नाव आहे, याप्रकरणी आता परतुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय..अखिल बिल्डर, इलियास कुरेशी, अमजत कुरेशी, इरफान शेख, जुनेद व इतर दोन आरोपी असे हल्ला करणाऱ्या आरोपीचे नाव असून,त्यांच्या विरोधात परतुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.. दरम्यान आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे..
Sangli News: संतापजनक! परप्रांतीय तरुणाचा 6 वर्षाच्या बालकावर अत्याचार
पुणे येथील महिलेवरील अत्याचाराची घटना ताजी असतानाच सांगलीच्या कवठेमहांकाळ शहरामध्ये गुरुवार दुपारच्या वेळेस एका परप्रांतीय तरुणाने 6 वर्षाच्या बालकावर लैंगिक अत्याचार केल्याची धकादायक व किळसवाणी घटना घडली आहे. पोलिसांनी नराधमास ताब्यात घेतले आहे.सद्या राहणार विठुरायाचीवाडी संशयित नराधम लोकेन केवलराम कासडे वय वर्षे 21 मुळचा मध्यप्रदेशचा आहे. याची व पीडित बालकाच्या कुटुंबाची ओळख आहे. गुरुवारी दुपारच्या सुमारास त्या बालकास कुरकुरे व पैसे देण्याचे खोलीत घेऊन गेला व त्याच्यावर लैंगिक अत्याचार केला याची कवठेमहांकाळ पोलिसात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
या घटनेमुळे कवठेमहांकाळ शहरामध्ये खळबळ माजली असून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे .
Dhule Crime: दोन हजाराची लाच घेणे पडले महागात; पोलिस कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात
अपघातग्रस्त मोटारसायकल नरडाणा पोलीस स्टेशनमध्ये जमा होती. याबाबत चौकशी करण्यासाठी गेलेल्या मोटारसायकल मालकाला उपस्थित गजेंद्र पावरा ह्या पोलीस कॉन्स्टेबलने दोन हजार रुपयांची मागणी केली. सदरची रक्कम स्वीकारणे पोलीस कॉन्स्टेबलला चांगलेच महागात पडले असून रक्कम स्वीकारताना धुळे एसीबीच्या पथकाने त्याला रंगेहाथ ताब्यात घेतले आहे. यामुळे नरडाणा पोलीस स्टेशनमध्ये खळबळ उडाली आहे.
आम्ही केलं काम निर्विवाद, म्हणूनच जनतेने आम्हाला दिला आशीर्वाद : एकनाथ शिंदे
महायुतीच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात सरकारने ऐतिहासिक विकासाकामे केली आणि कल्याणकारी योजना देखील आणल्या. विकासकामांच्या जोरावर जनतेने आम्हाला मोठं यश मिळवून दिले. राज्य सरकारच्या कामावर लोकांनी शिक्कामोर्तब केलं. आम्ही केलं काम निर्विवाद, म्हणूनच जनतेने आम्हाला दिला आशीर्वाद, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. विरोधकांना लोकांनी नापास केले आणि महायुतीला पास केलं. विरोधी पक्षनेता मिळण्याइतक्या जागाही महाविकास आघाडीला मिळल्या नाहीत, अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर निशाणा साधला.
राज्यासमोर आर्थिक संकट वाढले, आर्थिक पाहणी सर्वेक्षण अहवाल समोर
राज्याचा आर्थिक पाहणी सर्वेक्षण अहवाल समोर
राज्यासमोर आर्थिक संकट वाढले, महसुली उत्पन्नापेक्षा खर्च जास्त. कर्ज आणि व्याजापोटी मोठी रक्कम होतेय खर्च. भांडवली खर्चासाठी दुसरे कर्ज काढण्याशिवाय पर्याय नाही.
२०२४-२५ साठी राज्याची महसुली जमा ४ लाख ९९ हजार ४६३ कोटी रुपये अपेक्षित तर महसुली खर्च ५ लाख १९ हजार ५१४ कोटी अपेक्षित.
कर, महसूल आणि करेतर महसूल (केंद्रीय अनुदानासह) अनुक्रमे ४ लाख १९ हजार ९७२ कोटी आणि ७९ हजार ४९१ कोटी अपेक्षित.
२०२४-२५ मध्ये जानेवारी पर्यंत प्रत्यक्ष महसुली जमा ३ लाख ८१ हजार ८० कोटी रुपये ही रक्कम अर्थसंकल्पीय अंदाजाच्या ७६.३ टक्के आहे.
अर्थसंकल्पीय अंदाजानुसार २०२४-२५ करिता राज्याचा महसुली खर्च ५ लाख १९ हजार ५१४ कोटी अपेक्षित आहे.
स्थूल राज्य उत्पन्नाच्या तुलनेत कर्ज आणि व्याजापोटी १७.३ टक्के रक्कम खर्च होतंय.
सन २०२४-२५ च्या अर्थसंकल्पीय अंदाजानुसार राजकोषीय तूट २.४ टक्के, महसुली तुट ०.४ टक्के.
२०२४-२५ करिता राज्याचा प्राधान्य क्षेत्रासाठीचा वार्षिक कर्ज आराखडा ७ लाख २५ हजार कोटी आहे.
त्यामध्ये 'कृषि क्षेत्राचा हिस्सा २४.४ टक्के आणि 'सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग' क्षेत्राचा हिस्सा ६०.७ टक्के आहे.
ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांच्याविरोधात सत्ताधारी आक्रमक
ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांच्याविरोधात सत्ताधारी आक्रमक
अनिल परब यांनी आपला संभाजी महाराजांप्रमाणे छळ झाला असे म्हटले होते
संभाजी महाराजांशी केलेल्या तुलनेमुळे सत्ताधारी संतापले
परब यांनी नाक घासून माफी मागावी, नितेश राणेंची मागणी
अनिल परब हे छळ करणारे आहेत- नितेश राणे
नारायण राणे यांच्या अटकेचा उल्लेख करत राणेंची टीका
अभिनेत्रीचा बंगला तोडल्याच्या प्रकरणाचाही उल्लेख
धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मुद्द्यावरुन विधानसभेत गदारोळ
धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मुद्द्यावरुन विधानसभेत गदारोळ
- जयंत पाटील - धनंजय मुंडेंचा राजीनामा झाला की नाही याची माहिती संभागृहात दिली नाही. धनंजय मुंडेंचा राजीनामा झाली की नाही? जयंत पाटलांनी उपस्थित केला प्रश्न.
- नाना पटोले - आपल्या एका मंत्र्यांचा राजीनामा झालाय. पण याची माहिती सभागृहात देण्यात आलेली नाही. धनंजय मुंडे यांचा राजीनामा झालाय का याची माहिती द्यावी, अशी मागणी नाना पटोले यांनी केली.
पुण्यात हाय सिक्युरिटी नंबर प्लेट (HRSP) च्या त्रुटी विरोधात आंदोलन
पुण्यात हाय सिक्युरिटी नंबर प्लेट (HRSP) च्या त्रुटी विरोधात आंदोलन
पुण्यात प्रवासी व मालवाहतूकदार संघटनांनी बाबा आढाव यांच्या नेतृत्वात केलं आंदोलन
पुण्यातील आरटीओ कार्यालयाबाहेर रिक्षा संघटनांचे आंदोलन
वाहनांचा नंबर प्लेट बदलताना नियम पाळले जात नसल्याचा आरोप
बाबा आढाव यांच्याकडून RTO अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं
"अनिल परबांचं तातडीने निलंबन करा", भाजप आमदार प्रविण दरेकर यांची मागणी
अनिल परब यांचं तातडीने निलंबन करा, भाजप आमदार प्रविण दरेकर यांची मागणी
अनिल परब यांनी सभागृहात माफी मागावी, अन्यथा त्यांचं निलंबन करण्यात यावं
अनिल परब यांनी स्वत:ची तुलना संभाजी महाराजासोबत केली
अनिल परबांनी नाक्यावरची भाषा सभागृहात वापरु नये
पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी प्रदीप चंद्रन यांची नियुक्ती
पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी प्रदीप चंद्रन यांची नियुक्ती
पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्तपद गेल्या ११ महिन्यांपासून होते रिक्त
महापालिकेच्या रिक्त जागेवर राज्य शासनाकडून आयएएस अधिकाऱ्यांची नियुक्ती
मुंबई येथील उद्योग संचालनालयाचे अतिरिक्त विकास आयुक्तपदी कार्यरत असणारे एम. जे. प्रदीप चंद्रन यांची महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे
प्रदीप चंद्रन हे २०१२ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत
पुण्यातील चाकण जवळील वाकी येथे प्लास्टिक मोल्डिंग कंपनीला भीषण आग
पुणे : चाकण जवळील वाकी येथे प्लास्टिक मोल्डिंग मारुती इंडस्टियल इस्टेट कंपनीला लागली आग
रात्रीपासून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे प्रयत्न सुरु, आगीत कंपनीचे मोठे नुकसान
आगीसह धुराचे लोट उलटल्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करावे लागत आहेत
चाकण राजगुरुनगर नगरपरिषद, खेड सिटी, अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल
भंडारा नगरपरिषद पाणीपुरवठा विभागाकडे दोन कोटी थकीत; शहरात पाणीटंचाईची शक्यता
भंडारा नगरपरिषद जलपुरवठा विभागावर तब्बल 2 कोटी रुपयांची थकबाकी जमा झाल्याने महावितरणने वीजपुरवठा खंडित करण्याचा इशारा दिला आहे. शहरातील नागरिकांना नियमित पाणीपुरवठा करण्यासाठी वीजेचा वापर होतो. मात्र, नागरिक पाणीपट्टी भरत नसल्यामुळे नगरपरिषद आर्थिक अडचणीत सापडली आहे.जलपुरवठा विभाग नागरिकांना पाणीपुरवठा करतो, परंतु नागरिक पाणीपट्टी वेळेवर भरत नाहीत. परिणामी, नगरपरिषदेवर मोठ्या प्रमाणात आर्थिक ताण वाढला आहे.
पुण्यात जीबीएसचा धोका पुन्हा वाढण्याची शक्यता
पुण्यात जीबीएसचा धोका पुन्हा वाढण्याची शक्यता. सिंहगड रोड परिसरात पुन्हा आढळले जीबीएसचे संशयित रुग्ण आढळला. धोका टाळण्यासाठी शहरात आरोग्य विभाग सज्ज झाला आहे. शुद्ध पाणी पुरवठा करण्याचे आरोग्य विभागाचे महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाला पत्र. सिंहगड रोड परिसरात पिण्यास अयोग्य पाणी दिले जात असल्याचे तपासणीत आढळून आले आहे. त्यामुळे या भागात पुन्हा आजाराचा प्रसार होत आहे. यामुळे या पाणी पुरवठ्याबाबत चौकशी करून शुद्ध पाणी पुरवठा करावा, असे पत्रात नमूद केले आहे.