
IAS Transfer : राज्य सरकारने प्रशासकीय व्यवस्थेत मोठे फेरबदल करत भारतीय प्रशासन सेवेतील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काल, 30 जुलै रोजी रात्री उशिरा जाहीर केले. या बदल्यांमध्ये जिल्ह्यांच्या प्रमुख पदांवरून मंत्रालयातील महत्त्वाच्या विभागांपर्यंत अनेक अधिकाऱ्यांची नवीन नियुक्त्या करण्यात आल्या आहेत, ज्यामुळे राज्याच्या प्रशासनावर थेट परिणाम होणार आहे.
राज्य सरकारने केलेल्या या बदल्यांमुळे प्रशासकीय कामकाजात नवीन गती येईल अशी अपेक्षा आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ आपल्या नवीन पदांचा कार्यभार स्वीकारण्याचे आदेश देण्यात आले आहे.
(नक्की वाचा- BMC Recruitment: मुंबई महापालिकेमध्ये बंपर भरती! अनुपस्थित विद्यार्थ्यांना 'या' तारखेला शेवटची संधी)
IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या खालीलप्रमाणे
अजीज शेख : शिवशाही पुनर्वसन प्रकल्प, मुंबई येथील व्यवस्थापकीय संचालक पदावरूनअजीज शेख यांची आता धुळे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी बदली करण्यात आली आहे. धुळे जिल्ह्याच्या ग्रामीण विकासात त्यांच्या अनुभवाचा फायदा होईल अशी अपेक्षा आहे.
अशीमा मित्तल : नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या अशीमा मित्तल यांना जालना जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी पदावर नियुक्त करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी म्हणून त्यांची भूमिका जिल्ह्याच्या प्रशासकीय कामकाजासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
श्रीकृष्णनाथ पांचाळ : जालना जिल्ह्याचे विद्यमान जिल्हाधिकारी असलेले श्रीकृष्णनाथ पांचाळ यांची आता ठाणे जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी पदी बदली झाली आहे. मुंबईला लागून असलेला ठाणे जिल्हा भौगोलिक आणि लोकसंख्येच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असल्याने त्यांची नियुक्ती लक्षवेधी मानली जात आहे.
(नक्की वाचा- Devendra Fadnavis: उद्योगांच्या सर्व परवानग्या आता मैत्री पोर्टलवर ऑनलाईन मिळणार)
विकास खारगे : मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव म्हणून मंत्रालय, मुंबई येथे कार्यरत असलेल विकास खारगे यांची आता अप्पर मुख्य सचिव, महसूल विभाग, मंत्रालय, मुंबई या महत्त्वाच्या पदावर बदली झाली आहे. महसूल विभागातील त्यांची भूमिका राज्याच्या महसूल धोरणांसाठी कळीची ठरेल.
अनिल डिग्गीकर : दिव्यांग कल्याण विभाग, मंत्रालय, मुंबई येथील अप्पर मुख्य सचिव असलेले अनिल डिग्गीकर यांची आता अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई येथे अपर मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. हा विभाग थेट जनतेशी संबंधित असल्याने त्यांच्यावर मोठी जबाबदारी असणार आहे.
राज्य सरकारने केलेल्या या बदल्यांमुळे प्रशासकीय कामकाजात नवीन गती येईल अशी अपेक्षा आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ आपल्या नवीन पदांचा कार्यभार स्वीकारण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world