जाहिरात

Maharashtra Politics : महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळण्याचा मार्ग मोकळा? या 3 नेत्यांची नावे चर्चेत

Vidhan Sabha Opposition Leader post : शिवसेना ठाकरे गटाकडून 25 नोव्हेंबर 2024 ला विधीमंडळ सचिवालयाला पत्र देऊन विरोधी पक्ष नेते संदर्भात नियमावली मागवली होती.

Maharashtra Politics : महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळण्याचा मार्ग मोकळा? या 3 नेत्यांची नावे चर्चेत

राज्यात महायुतीचं सरकार स्थापन होऊन जवळपास 3 महिने झाले आहेत. मात्र अजूनही विरोधी पक्षनेतेपद अद्याप रिक्त आहे.  विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदावर दावा करण्यासाठी एखाद्या पक्षाला एकूण जागांपैकी 10 टक्के जागा मिळवणे आवश्यक असते. मात्र विधानसभा निवडणुकीत विरोधी पक्षनेतेपदाला लागणारी सभासद संख्या देखील विरोधी पक्षाला गाठता आलेली नाही. त्यामुळे विरोधी पक्षाचा पेच कायम होता. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मात्र आता महाविकास आघाडीला विरोधी पक्ष नेता मिळण्याची शक्यता आहे. विरोधी पक्ष नेते पदासाठी किती सदस्य संख्या असावी असा नियमात कोणताही उल्लेख नाही. विधानसभेचा विरोधी पक्ष नेता निवडीसंदर्भात कोणतेही लिखित नियम नाहीत. विधानसभा सचिवालयाकडून ठाकरे गटाला उत्तर असं उत्तर देण्यात आलं आहे. 

Mahavikas Aghadi

(नक्की वाचा-Santosh Deshmukh Murder Case: आरोपपत्रातील 'ती' ओळ वगळावी; अंजली दमानियांनी का केली मागणी?)

विधिमंडळ सचिवांचं उत्तर

शिवसेना ठाकरे गटाकडून 25 नोव्हेंबर 2024 ला विधीमंडळ सचिवालयाला पत्र देऊन विरोधी पक्ष नेते संदर्भात नियमावली मागवली होती. यासंदर्भात विरोधी पक्षनेता निवडीसंदर्भात महाराष्ट्र विधानसभा नियमात कोणतीही विवक्षित तरतूद नाही असं उत्तर विधीमंडळ सचिवांनी दिलं आहे.  

संसदीय प्रथा आणि परंपरा यांचा सांगोपांग विचार करून अध्यक्ष, महाराष्ट्र विधानसभा हे आपल्या अधिकारात विरोधी पक्षनेता, महाराष्ट्र विधानसमा यांच्या नियुक्तीसंदर्भात निर्णय घेत असतात असंही विधीमंडळ सचिवांनी म्हटलं आहे. 

(नक्की वाचा- रक्षा खडसेंच्या मुलीची छेड काढणारे कोण? CM फडणवीसांच्या प्रतिक्रियेने राजकारणात खळबळ; म्हणाले...)

विरोधी पक्षनेते पदासाठी 3 नावांची चर्चा

महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाने विरोधी पक्षनेतेपदावर दावा केला आहे. विरोधी पक्षनेते पदासाठी शिवसेना ठाकरे गटाकडून भास्कर जाधव, आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभू यांच्या नावाची चर्चा होत आहे. ठाकरेंच्या आमदारांच्या बैठकीत विरोधीपक्षनेते पदासाठी कोणाच नावं अंतिम करायचं? यावर देखील चर्चा झाली होती. मात्र विरोधी पक्षनेतेपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार हे लवकरच स्पष्ट होईल. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: