जाहिरात

Mumbai News: जुलाबाने त्रस्त, नको तिथे बसला अन् जीव गेला; नेमकं काय घडलं?

Mumbai News : आरएके मार्ग पोलीस ठाण्याच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, उंच इमारतीत राहणारा हा माणूस गेल्या काही दिवसांपासून जुलाबाच्या त्रासाने ग्रस्त होता.

Mumbai News: जुलाबाने त्रस्त, नको तिथे बसला अन् जीव गेला; नेमकं काय घडलं?

Mumbai News : मुंबईत एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. जिथे जुलाबाने त्रस्त असलेल्या एका 52 वर्षीय व्यक्तीचा 18 व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला. घरात शौचालय उपलब्ध नसल्याने बाहेर शौचास बसण्याच्या प्रयत्नात हा अपघात घडला. मध्य मुंबईतील वडाळा येथील १८ मजली मातोश्री सदन इमारतीत रविवारी ही घटना घडली. 

आरएके मार्ग पोलीस ठाण्याच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, उंच इमारतीत राहणारा हा माणूस गेल्या काही दिवसांपासून जुलाबाच्या त्रासाने ग्रस्त होता. तो त्याच्या बहिणीसोबत 18 व्या मजल्यावर राहत होता. त्यांच्या घरात कोणीतरी शौचालय वापरत होते. शौचास जाण्याच्या तीव्र गरजेपोटी, तो घराबाहेर पडला आणि लिफ्टच्या शेजारी असलेल्या एका अरुंद शाफ्टजवळ बसला. त्याचवेळी त्याचा तोल सुटला आणि तो थेट खाली पडला.

(नक्की वाचा- Navi Mumbai: सासूने जावयाला हाताशी धरलं, ड्रग्जचा बाजार मांडला, छाप्यात घबाड सापडलं)

अपघातानंतर तातडीने पोलीस आणि अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना माहिती देण्यात आली. त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन त्या व्यक्तीला खड्ड्यातून बाहेर काढले आणि रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

(नक्की वाचा- Shocking News: 10 दिवसांचं प्रेम, रुमवर रोमान्स.. शारीरिक संबधावेळी अल्पवयीन मुलीचा मृत्यू; असं काय घडलं?)

या घटनेची नोंद 'अपघाती मृत्यू' म्हणून करण्यात आली असून, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. या दुर्घटनेने इमारतींमधील सुरक्षा आणि अत्यावश्यक सुविधांच्या उपलब्धतेबद्दल प्रश्न निर्माण केले आहेत.

(ही बातमी एनडीटीव्ही टीमने संपादित केलेली नाही. ही बातमी सिंडीकेट फीडद्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. )

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com