जाहिरात

Dombivli Marathi Controversy: मराठीत बोलण्यास नकार, महिलेची अरेरावी; मनसेच्या एन्ट्रीनंतर सगळ्यांची जिरली

Kalyan News : श्रीनिवास घाणेकर यांनी मराठीत बोलण्याची विनंती केली असता, महिला कर्मचाऱ्याने संतापून ‘मराठी बोलण्याची सक्ती आहे का?’ असे म्हणत त्यांच्याशी अरेरावी केली, ज्यामुळे वातावरण तापले आहे.

Dombivli Marathi Controversy: मराठीत बोलण्यास नकार, महिलेची अरेरावी; मनसेच्या एन्ट्रीनंतर सगळ्यांची जिरली

अमजद खान, कल्याण

Kalyan Marathi Vs Hindi: कल्याणमधील एका ‘पटेल मार्ट' नावाच्या दुकानात मराठी भाषेवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास घाणेकर या दुकानात खरेदीसाठी गेले असताना एका महिला कर्मचाऱ्यासोबत त्यांचा मराठी बोलण्यावरून जोरदार वाद झाला. घाणेकर यांनी मराठीत बोलण्याची विनंती केली असता, महिला कर्मचाऱ्याने संतापून ‘मराठी बोलण्याची सक्ती आहे का?' असे म्हणत त्यांच्याशी अरेरावी केली, ज्यामुळे वातावरण तापले आहे.

या घटनेनंतर श्रीनिवास घाणेकर यांनी तात्काळ दुकानाच्या व्यवस्थापक मनीषा धस यांना या प्रकाराची माहिती दिली. त्याच वेळी, काही मनसे कार्यकर्ते देखील घटनास्थळी पोहोचले. मॅनेजर मनीषा धस यांनी या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली आणि भविष्यात असे प्रकार घडणार नाहीत असे आश्वासन दिले.

(नक्की वाचा-  Sangli Crime: सांगलीत स्पेशल 26! तोतया अधिकारी, खोटी IT रेड अन् कोट्यवधींची लूट, कसा घडला थरार?)

15 ऑक्टोबरपर्यंतचा अल्टिमेटम

या घटनेनंतर श्रीनिवास घाणेकर यांनी ‘पटेल मार्ट'ला 15 ऑक्टोबरपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. त्यांनी सांगितले आहे की, जर 15 ऑक्टोबरपर्यंत दुकानातील सर्व कर्मचाऱ्यांनी मराठीत बोलण्यास सुरुवात केली नाही, तर ते दुकानाच्या बाहेर उभे राहून नागरिकांना येथून खरेदी न करण्याचे आवाहन करतील.

(नक्की वाचा-  Pune School Holiday: पुण्यात अनेक शाळांना सुट्टी जाहीर, मुसळधार पावसाने अनेक ठिकाणी पाणी साचलं)

व्यवस्थापक मनीषा धस यांनी घाणेकर आणि मनसे कार्यकर्त्यांना आश्वासन दिले आहे की, दुकानातील सर्व कर्मचारी मराठीतच बोलतील. मात्र, हा वाद सध्या सोशल मीडियावरही चर्चेचा विषय बनला आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com