
Mega Block on Harbor Line: कुर्ला आणि टिळक नगर स्टेशनदरम्यान नवीन डायव्हर्जन मार्गिकेच्या कामासाठी मध्य रेल्वेने हार्बर मार्गावर विशेष 'ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक' जाहीर केला आहे. हा ब्लॉक 13 सप्टेंबर, 2025 (शनिवार) रात्री 11.05 वाजल्यापासून ते 14 सप्टेंबर, 2025 (रविवार) दुपारी 1.35 वाजेपर्यंत असेल. सुमारे 14.30 तासांच्या या ब्लॉकमुळे वडाळा रोड ते मानखुर्ददरम्यान लोकल सेवा पूर्णपणे बंद राहणार आहे.
कधी असेल ब्लॉक?
ब्लॉक कालावधी: 13 सप्टेंबर, 2025 (शनिवार) रात्री 11.05 ते 14 सप्टेंबर, 2025 (रविवार) दुपारी 1.35.
ब्लॉक विभाग: वडाळा रोड आणि मानखुर्द स्थानकांदरम्यान अप आणि डाउन हार्बर मार्ग.
कोणत्या लोकलवर परिणाम होईल?
ब्लॉकच्या वेळेत वडाळा रोड ते मानखुर्ददरम्यान कोणतीही लोकल धावणार नाही.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून सुटणाऱ्या डाउन हार्बर सेवा 13 सप्टेंबर, 2025 (शनिवार) रात्री 10.20 पासून ते 14 सप्टेंबर, 2025 (रविवार) दुपारी 1.19 पर्यंत रद्द असतील.
पनवेलहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी सुटणाऱ्या अप हार्बर सेवा 13 सप्टेंबर, 2025 (शनिवार) रात्री 10.07 पासून ते 14 सप्टेंबर, 2025 (रविवार) दुपारी 12.56 पर्यंत रद्द असतील.
( नक्की वाचा : सरकारी नोकरभरतीचा खेळखंडोबा; SSC च्या परीक्षांमध्ये मोठा गोंधळ, डोंबिवलीचे शेकडो विद्यार्थी त्रस्त )
ब्लॉकपूर्वीची आणि ब्लॉकनंतरची पहिली लोकल कधी?
ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल:
अप हार्बर: पनवेल/बेलापूर/वाशीहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणारी शेवटची लोकल 13 सप्टेंबर, 2025 (शनिवार) रोजी पनवेलहून रात्री 9.52 वाजता सुटेल.
डाउन हार्बर: वाशी/बेलापूर/पनवेलकडे जाणारी शेवटची लोकल 13 सप्टेंबर, 2025 (शनिवार) रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून रात्री 10.14 वाजता सुटेल.
( नक्की वाचा : New Elphinstone Bridge: कसा दिसेल मुंबईतील पहिला डबल डेकर ब्रीज? परवागन्या मिळताच 1 वर्षात काम पूर्ण होणार )
ब्लॉकनंतरची पहिली लोकल:
अप हार्बर: पनवेल/बेलापूर/वाशीहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणारी पहिली लोकल 14 सप्टेंबर, 2025 (रविवार) रोजी पनवेलहून दुपारी 1.09 वाजता सुटेल.
डाउन हार्बर: पनवेल/बेलापूर/वाशीकडे जाणारी पहिली लोकल 14 सप्टेंबर, 2025 (रविवार) रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दुपारी 1.30 वाजता सुटेल.
प्रवाशांच्या सोयीसाठी, ब्लॉकदरम्यान पनवेल ते मानखुर्ददरम्यान विशेष लोकल चालवल्या जातील. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. हे देखभाल आणि दुरुस्तीचे काम सुरक्षिततेसाठी आणि रेल्वेच्या पायाभूत सुविधा चांगल्या ठेवण्यासाठी आवश्यक आहे, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world