
उपनगरीय रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गावर रविवारी 29.09.2024 रोजी मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे. विविध अभियांत्रिकी आणि देखभाल दुरुस्तीची कामे करण्यासाठी उपनगरीय सेवेवर हा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी 11.05 पासून ते दुपारी 03.55 पर्यंत हा मेगाब्लॉक असणार आहे. तर हार्बर मार्गावर कुर्ला वाशी दरम्यान हा मेगाब्लॉक असेल.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 10.14 पासून ते दुपारी 03.18 पर्यंत सुटणाऱ्या डाऊन धिम्या मार्गावरील सेवा माटुंगा ते मुलुंड स्थानकांदरम्यान शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड दरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील. मुलुंडपुढे डाऊन धिम्या मार्गावर वळवण्यात येतील. यावेळी लोकल जवळपास 15 मिनिटे उशिराने पोहोचतील.
ट्रेंडिंग बातमी - 'सांगली पॅटर्न'ची आठवण करुन द्या, शिवसेनेच्या आक्रमकतेला आवर घालण्यासाठी काँग्रेस हायकमांडचे आदेश?
ठाणे येथून सकाळी 10.58 पासून ते दुपारी 3.59 पर्यंत सुटणाऱ्या अप धीम्या मार्गावरील सेवा मुलुंड येथून अप जलद मार्गावर वळविण्यात येतील. मुलुंड ते माटुंगा स्थानकांदरम्यान मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि शीव येथे त्या थांबविल्या जातील. त्यानंतर माटुंगा स्थानकापासून पुढे अप धिम्या मार्गावर वळवण्यात येतील. या लोकल ही पंधरा मिनिटे उशिराने पोहोचतील. ब्लॉकपूर्वी डाऊन धिम्या मार्गावर, शेवटची लोकल टिटवाळा लोकल असेल. ती छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 09.53 वाजता सुटेल. ब्लॉकनंतरची पहिली लोकल आसनगाव लोकल असेल. ती छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दुपारी 3.32 वाजता सुटेल. ब्लॉकपूर्वी अप धीम्या मार्गावर, शेवटची लोकल आसनगाव लोकल असेल. ती ठाणे येथून सकाळी 10.27 वाजता सुटेल. ब्लॉकनंतर पहिली लोकल कल्याण लोकल असेल. जी ठाणे येथून दुपारी 4.03 वाजता सुटेल.
हार्बर मार्गावर ही मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. हा ब्लॉक कुर्ला ते वाशी दरम्यान असेल. अप आणि डाऊन हार्बर मार्गावर सकाळी 11.10 पासून ते दुपारी 04.10 पर्यंत हा ब्लॉक असेल. या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 10.34 ते दुपारी 3.36 पर्यंत वाशी/बेलापूर/पनवेल करीता सुटणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा आणि पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी 10.16 ते दुपारी 3.47 वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस करीता सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा पूर्णतः रद्द राहतील.
ब्लॉकपूर्वी डाऊन हार्बर मार्गावर, शेवटची लोकल पनवेल लोकल असेल. जी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 10.18 वाजता सुटेल. ब्लॉकनंतरची पहिली लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून 03.44 वाजता सुटणारी पनवेल लोकल असेल. अप हार्बर मार्गावर, ब्लॉकपूर्वी शेवटची लोकल पनवेल येथून सकाळी 10.05 वाजता सुटेल. ब्लॉकनंतरची पहिली लोकल पनवेलहून दुपारी 3.45 वाजता सुटेल. मात्र ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कुर्ला आणि कुर्ला-पनवेल/वाशी दरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील.
ट्रेंडिंग बातमी - मतदाना आधी निवडणूक आयोगाची चिंता, विधानसभेची तयारी कशी?
हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी 10.00 ते संध्याकाळी 06.00 वाजेपर्यंत ठाणे - वाशी/नेरूळ स्थानकावरून प्रवास करण्याची परवानगी देण्यात येत आहे. हा मेगा ब्लॉक पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहे असे मध्य रेल्वेने स्पष्ट केले आहे. प्रवाशांना विनंती करण्यात येत आहे की, यामुळे होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनास सहकार्य करावे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world