जाहिरात

रविवारी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक, कोणत्या लोकल होणार रद्द?

हा मेगा ब्लॉक सकाळी 11 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत असणार आहे. विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी हा मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे.

रविवारी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक, कोणत्या लोकल होणार रद्द?
मुंबई:

रविवारी गरज असेल तरच बाहेर पडा. कारण रविवारी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. हा मेगा ब्लॉक सकाळी 11 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत असणार आहे. विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी हा मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड दरम्यान मेगाब्लॉक असेल तर हार्बर मार्गावर वर मानखुर्द ते वडाळा या दरम्यान मेगाब्लॉक असेल. हार्बर मार्गावर मेगाब्लॉक दरम्यान रेल्वे वाहतूक बंद राहाणार आहे. 

('NDTV मराठी'चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा ) 

माटुंगा ते मुलुंड दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी 11.05 ते दुपारी 3.55 वाजेपर्यंत हा मेगा ब्लॉक असेल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 10.14 ते दुपारी 3.18 पर्यंत सुटणाऱ्या डाऊन धीम्या मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील. त्यानंतर पुन्हा मुलुंड डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील. त्यामुळे गाड्या पंधरा मिनिटे उशिराने पोहोचतील. 

ट्रेंडिंग बातमी - पुणे तिथे काय उणे! प्रेमी युगुलांसाठी स्वतंत्र बाग, ही मागणी का जोर धरते?

ठाणे येथून सकाळी 10.58 ते दुपारी 3.59 पर्यंत सुटणाऱ्या अप धीम्या मार्गावरील सेवा मुलुंड आणि माटुंगा स्थानकांदरम्यान मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि शीव स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील. पुढे अप धीम्या मार्गावर पुन्हा वळवल्या जातील. या गाड्या ही नियोजीत वेळेच्या 15 मिनिटे उशिराने पोहोचतील असे मध्य रेल्वेने स्पष्ट केले आहे. सकाळी 11.00 ते संध्याकाळी 5.00 दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सुटणाऱ्या आणि पोहोचणाऱ्या सर्व अप आणि डाऊन लोकल नियोजित वेळेपेक्षा 15 मिनिटे उशिराने पोहोचतील.

( नक्की वाचा : सलमान खानच्या घरावर गोळी चालवणारा 'मामा' कोण? मुंबई पोलिसांसमोर नवी डोकेदुखी )

ब्लॉकपूर्वी शेवटची लोकल टिटवाळा लोकल असेल. जी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 9.53 वाजता सुटेल. ब्लॉकनंतर पहिली लोकल आसनगाव लोकल असेल. जी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून दुपारी 3.32 वाजता सुटेल. ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल ही आसनगाव लोकल आहे. जी ठाणे येथून सकाळी 10.27 वाजता सुटेल. ब्लॉकनंतर पहिली लोकल कल्याण लोकल ठाणे येथून दुपारी 04.03 वाजता सुटेल.

ट्रेंडिंग बातमी -  छ. संभाजीनगर आणि धाराशिव नामांतर प्रकरणी याचिका फेटाळली, सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटलं?

हार्बर मार्गावरही रविवारी मेगाब्लॉक आहे.  वडाळा रोड आणि मानखुर्द दरम्यान अप आणि डाऊन हार्बर मार्गावर सकाळी 11.00 ते सायंकाळी 4.00 पर्यंत मेगाब्लॉक असेल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते वांद्रे- गोरेगाव सेवांवर या मेगा ब्लॉकचा कोणताही परिणाम होणार नाही. ब्लॉक कालावधीत वडाळा रोड आणि मानखुर्द स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन हार्बर मार्ग बंद राहील. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 10.03 ते दुपारी 3.54 वाजेपर्यंत   वाशी/बेलापूर/पनवेलसाठी सुटणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा आणि  वाशी/बेलापूर/पनवेल येथून सकाळी 9.40 ते दुपारी 3.28 वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई करीता सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील. ब्लॉक कालावधीत पनवेल ते मानखुर्द दरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com