जाहिरात

म्हाडाच्या 2030 घरांसाठी किती अर्ज? घरांची लॉटरी कधी?

म्हाडाच्या घरांसाठी मुंबईकरांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. परवडणाऱ्या घरांसाठी लोकांचा ओढा त्यातून दिसून येत आहेत.

म्हाडाच्या 2030 घरांसाठी किती अर्ज? घरांची लॉटरी कधी?
मुंबई:

म्हाडाच्या 2030 सदनिकांची विक्री केली जाणार आहे. त्यासाठी अर्ज मागवण्यात आले होते. या सदनिका विक्रीच्या संगणकीय सोडत प्रक्रियेला अर्जदारांचा उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला आहे. त्यासाठी तब्बल 1 लाख 34 हजार 350  अर्ज संगणकीय सोडत प्रणालीमध्ये प्राप्त झाले आहेत. यापैकी 1 लाख 13 हजार 811 अर्जदारांनी अनामत रकमेचा भरणा करून सोडत प्रक्रियेतील सहभाग निश्चित केला आहे. पात्र ठरलेल्या अर्जदारांना आता प्रतिक्षा आहे ती म्हाडाच्या या सोडतीची.  

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मुंबई मंडळातर्फे अर्ज भरणा करण्याची मुदत 19 सप्टेंबर रोजी रात्री 11.59 वाजता संपली.अर्जदारांना अनामत रकमेचा ऑनलाइन भरणा करण्यासाठी देखील रात्री 11.59 पर्यन्त मुदत देण्यात आली होती. त्यानंतर 27 सप्टेंबर 2024  रोजी संध्याकाळी 6.00 वाजता सोडतीसाठी प्राप्त अर्जांची प्रारूप यादी म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानंतर  29 सप्टेंबर 2024  रोजी दुपारी 12.00 वाजेपर्यंत प्रारूप यादी प्रसिद्ध झाल्यापासून ऑनलाईन दावे-हरकती  अर्जदारांना दाखल करता येणार आहेत. 3 ऑक्टोबर 2024 रोजी संध्याकाळी 6.00 वाजता सोडतीसाठी स्वीकृत अर्जांची अंतिम यादी म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे.

ट्रेंडिंग बातमी - Akshay Shinde Encounter : 'अक्षय शिंदेचा एन्काउंटर नाही', उच्च न्यायालय म्हणाले...

उत्पन्न गट निहाय या सोडतीत अत्यल्प उत्पन्न गटातील एकूण 359 सदनिकांकरीता 50,993 अर्ज सादर झाले आहेत. त्यापैकी  47,134 अर्जदारांनी अनामत रकमेचा भरणा केला आहे. अल्प उत्पन्न गटातील एकूण 627 सदनिकांकरीता  61,571 अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी  48,762 अर्जदारांनी अनामत रकमेचा भरणा केला आहे. मध्यम उत्पन्न गटातील एकूण 768  सदनिकांकरीता 14,293  अर्ज सादर झाले आहेत. त्यापैकी  11,461 अर्जदारांनी अनामत रकमेचा भरणा केला आहे . तसेच उच्च उत्पन्न गटातील एकूण 276 सदनिकांकरीता  7493 अर्ज  प्राप्त झाले आहेत. त्यापैकी  6454 अर्जदारांनी अनामत रकमेचा भरणा केला आहे.

ट्रेडिंग बातमी - अक्षय शिंदेचं घर महिन्याभराने उघडलं, मृतदेह आणणार, घरी कोण-कोण आले?

म्हाडाच्या घरांसाठी मुंबईकरांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. परवडणाऱ्या घरांसाठी लोकांचा ओढा त्यातून दिसून येत आहेत. म्हणूनच 2 हजार 030 घरांसाठी तब्बल 1 लाख 34 हजार अर्ज आले आहे. सदनिकांच्या वितरणाकरिता प्राप्त अर्जांची संगणकीय सोडत आता  8 ऑक्टोबर 2024 रोजी दक्षिण मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे काढण्यात येणार आहे. त्यावेळी भाग्यवान विजेत्यांची नावे घोषित केली जाणार आहेत. त्याचवेळी कोणाल घर मिळाले आणि कोणाच्या पदरात निराशा पडली हे स्पष्ट होणार आहे. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com