जाहिरात

'एकनाथ शिंदेंमुळे मनसेला महायुतीत सामील होता आलं नाही'; मनसेच्या बैठकीत सूर

MN Meeting : विधानसभा निवडणुकीतील पराभव आणि आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने मनसेचा राज ठाकरे यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक पार पडली.

'एकनाथ शिंदेंमुळे मनसेला महायुतीत सामील होता आलं नाही'; मनसेच्या बैठकीत सूर

एकनाथ शिंदे यांच्यामुळेच मनसे युतीत सहभागी झाली नाही. भाजपची मनसेसोबत युतीची तयारी होती, मात्र एकनाथ शिंदे यांची तयारी नसल्याने मनसेला महायुतीत सहभागी होता आलं नाही, असा सूर मनसेच्या बैठकीत पाहायला मिळाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. शिवतीर्थावर मनसेची ही महत्त्वाची बैठक पार पडली. यावेळी मनसेचे प्रमुख पदाधिकारी आणि मुंबईतील पदाधिकारी बैठकीला उपस्थित होते.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

विधानसभा निवडणुकीतील पराभव आणि आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने मनसेचा राज ठाकरे यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक पार पडली. बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली. विधानसभा निवडणुकीत मनसे महायुतीत सहभागी होण्यास इच्छुक होती. मात्र मात्र एकनाथ शिंदे यांची यासाठी तयारी नव्हती. त्यामुळे भाजपची इच्छा असून देखील मनसे महायुतीत सहभागी होऊ शकली नाही, असं मनसेच्या पदाधिकांनी बैठकीत सांगितलं.  

(नक्की वाचा-  EC on EVM : ईव्हीएम घोटाळा ते संथ मतदान.. निवडणूक आयुक्तांनी दिलं सर्व आक्षेपांना उत्तर)

मात्र विधानसभा निवडणुकीत जे झालं ते विसरा आणि महापालिका निवडणुकांच्या तयारीला लागा, असे आदेश राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्याची सूत्रांची माहिती आहे. आगामी महापालिका निवडणुकीपूर्वी मनसे नेत्यांची एक टीम राजकीय स्थितीचा आढावा घेणार आहे. 

आगामी निवडणुकीत मनसेची राजकीय वाटचाल, इतर पक्षांसोबत युतीबाबतच्या चर्चा याबाबतचे अंतिम निर्णय घेतांना राजकीय आढावा घेणाऱ्या टीमची मते लक्षात घेतली जातील. मनसेच्या विभाग अध्यक्षांना संघटना बळकट करण्याचे आदेश या बैठकीत देण्यात आले आहेत.

(नक्की वाचा - Road Accident : भाजपच्या माजी आमदारांच्या नातवाचा भीषण अपघातात मृत्यू, केचे कुटुंबावर दु:खाचा डोंगर)

मनसेत मोठे फेरबदल होणार?

विधानसभेनंतर महापालिका निवडणुकांसाठी  मनसेत मोठे बदल होण्याची शक्यता आहे. विधानसभेनंतर महापालिकेला कसं सामोरं जायचं याबाबत बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे.  मनसेमध्ये बदल व्हावेत हा निर्णय आजच्या बैठकीत झाला. पक्षात महत्वाचे अंतर्गत बदल होणार असल्याचंही बोललं जात आहे.  

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com