
डिलिव्हरी बॉयवर रागाच्या भरात एका व्यक्तीने 'एअर गन'ने गोळी झाडली. मुंबईच्या लोअर परळ भागात ही धक्कादायक घटना घडली आहे. यात सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही. पोलिसांच्या सूत्रांनुसार, आरोपीने ऑनलाइन औषधांची ऑर्डर दिली होती. जेव्हा डिलिव्हरी बॉय पार्सल घेऊन लोअर परळमधील नित्यानंद कॉलनी, प्रकाश कॉटन बिल्डिंगमध्ये पोहोचला त्यानंतर खरा वाद सुरू झाला. त्यातूनच ही गोळीबाराची घटना घडली आहे.
नक्की वाचा - Kalyan News: खड्ड्यामुळे आणखी एकाचा बळी, शिंदेंच्याच कार्यकर्त्याचा एकुलता एक लेक गेला
डिलिव्हरी बॉय पार्सल घेवून पोहोचला. त्यावेळी आरोपीने पार्सल घेण्यास नकार दिला. तो म्हणाला त्याने दुसरी औषधे मागवली होती. ही औषधं आपली नाहीत. दिलेली औषधं आणि पाठवलेली औषधं यात फरक आहेत. त्यामुळे हे पार्सल आपलं नाही असं त्याने सांगितले. याच दरम्यान, डिलिव्हरी बॉयने पार्सल देण्यासाठी दोनदा बेल वाजवली. या गोष्टीमुळे आरोपी चिडला आणि रागाच्या भरात त्याने आपली 'एअर रायफल' काढून हवेत गोळी झाडली.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर एन. एम. जोशी मार्ग पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले. तपासामध्ये आरोपीची ओळख सौरभ कुमार अविनाश कुमार सिंग (35) अशी झाली. तो त्याच इमारतीत राहतो. चौकशीत आरोपीने रागाच्या भरात गोळीबार केल्याचे कबूल केले.पोलिसांच्या सूत्रांनुसार, या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही. आरोपी आणि ज्याने फोन केला होता, त्या दोघांनाही चौकशीसाठी पोलीस ठाण्यात आणले होते. एन. एम. जोशी मार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world