
Mumbai Metro 3 : मुंबईतील पहिल्या भूमिगत मेट्रोने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता तिकीट काउंटरवर रांगेत उभे राहण्याची गरज राहणार नाही. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (NCMC) तयार केले आहे. या एका कार्डद्वारे, प्रवाशांना मेट्रो-3 तसेच मुंबईत धावणाऱ्या इतर मेट्रो मार्गांसाठी तिकिटे खरेदी करता येतील.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
या कार्डद्वारे बेस्ट बसेसची तिकिटे देखील खरेदी करता येतील. बुधवार म्हणजे आजपासून कॉन्टॅक्टलेस नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड प्रवासी वापरू शकतील, असे मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने सांगितले.या कार्डमुळे प्रवाशांना फक्त कार्ड टॅप करून आरे जेव्हीएलआर ते आचार्य अत्रे चौक स्थानकांदरम्यान प्रवास करता येणार आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत एमएमआरसीने नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) आणि स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या सहकार्याने हे रुपे कार्ड लाँच केले.
(नक्की वाचा- नागपुरात मान्सूनपूर्व कामांची लगबग, शहराच्या काही भागांत 116 वस्त्यांमध्ये आज वीज पुरवठा बंद राहणार)
अॅक्वा लाईन हा शहरातील पहिला पूर्णपणे भूमिगत मेट्रो कॉरिडॉर आहे. प्रवासी आता मेट्रो लाईन 3, मेट्रो लाईन 2ए आणि 7 आणि मेट्रो लाईन 1 मध्ये समान एनसीएमसी कार्ड वापरू शकतात, ज्यामुळे एकसंध आणि सोयीस्कर प्रवास अनुभवता येणार आहे," असं एमएमआरसीच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
(नक्की वाचा- 'धारावी प्रकल्प हा मुंबईच्या पुनर्विकासाचा केंद्रबिंदू', CEO श्रीनिवास यांनी सांगितले संपूर्ण व्हिजन!)
इतर मेट्रो लाईन्स आणि चलो बस सारख्या वाहतूक ऑपरेटरद्वारे जारी केलेले एनसीएमसी कार्ड पूर्णपणे सुसंगत आहेत आणि कोणत्याही मेट्रो लाईन 3 स्टेशनवर वापरले जाऊ शकतात. ही कार्डे मोफत उपलब्ध आहेत, प्रवास वापरासाठी किमान 100 रुपये आणि 2000 रुपयांपर्यंत टॉप-अप करावा लागेल, असं एमएमआरसीने स्पष्ट केलं आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world