Mumbai News : मुंबईत होणाऱ्या लाइव्ह म्युझिक कॉन्सर्ट आता तरुणांसाठी मनोरंजनाऐवजी जोखमीच्या ठरत आहेत. गोरेगावच्या नेस्कोमध्ये झालेल्या दुर्देवी घटनेच्या काही दिवसांनंतर आता दक्षिण मुंबईतील वरळी भागातील प्रसिद्ध NSCI डोम कॉन्सर्टमधून एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. या कार्यक्रमात अचानक एका २८ वर्षीय तरुणाची तब्येत बिघडली आणि रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला. वारंवार घडणाऱ्या या प्रकरणांमुळे मुंबईतील नाइटलाइफ, सुरक्षा व्यवस्था आणि कॉन्सर्टमधील वाढणाऱ्या अमली पदार्थांच्या वापरामुळे गंभीर सवाल उपस्थित होत आहेत.
दारूच्या नशेत तरुण आणि त्याची मैत्रिण...
ही घटना ताडदेव पोलीस हद्दीतील वरळीच्या NSCI डोममध्ये घडली. येथे शनिवारी माहीममध्ये राहणारा २८ वर्षीय वृषभ महेंद्र गांगुर्डे याचा मृत्यू झाला. सूत्रांनुसार, तरुण नशेच्या अवस्थेत होता. त्याच्यासोबत असलेली मैत्रिणदेखील कथितपणे दारूच्या नशेत होती. रात्री साधारण ९ च्या दरम्यान दोघांची प्रकृती बिघडली. दोघांना तत्काळ रुग्णालयात घेऊन जाण्यात आलं. येथे उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू झाला. तर तरुणीची प्रकृती स्थिर असल्याचं सांगितलं जात आहे. पोलिसांच्या तपासात अद्याप तरी कोणत्याही प्रकारचे ड्रग्स सेवन केल्याचे पुरावे सापडलेले नाही.
हृदयविकाराचा संशय...
अधिकाऱ्यांकडून सध्या ड्रग्सचा अँगल तपासला जात आहे. प्राथमिक स्तरावर हॉर्ट अटॅकचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र अद्याप याची अधिकृत माहिती मिळू शकलेली नाही. तरुणाच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. पोस्टमार्टम आणि अन्य फॉरेन्सिक रिपोर्टची प्रतीक्षा आहे. घटनेदरम्यान नेमकं काय घडलं आणि तरुणाची प्रकृती कशी खालावली याचा तपास केला जात आहे. प्राथमिक माहितीनुसार, कॉन्सर्टमध्ये मोठ्या संख्येने लोकांची गर्दी होती, ज्यावेळी दोघांनाही गुदमरल्याचा त्रास जाणवत असल्याचं सांगितलं जात आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world