
मुंबईच्या अंधेरी पश्चिम येथील आराम नगरमध्ये एका ऑटो रिक्षातून चोरट्यांनी अवघ्या काही मिनिटांत चार मॅनहोलच्या जाळ्या चोरून नेल्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. या चोरीमुळे पादचाऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला असून, अशा चोरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. या घटनेचा व्हिडिओ @AndheriLOCA या ट्विटर हँडलवर पोस्ट करण्यात आला आहे. यामुळे मुंबईकरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
चोरीचा हा प्रकार अत्यंत पूर्वनियोजित आणि जलद गतीने करण्यात आला. चोरट्यांनी मॅनहोलच्या जाळ्या काही मिनिटांतच काढल्या आणि ऑटोमध्ये ठेवून पसार झाले. या घटनेनंतर अनेक जण मॅनहोलच्या डिझाइनवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. ते सहजपणे काढता येत असल्यानेच अशा चोऱ्या वाढल्या आहेत, असे मत व्यक्त होत आहे.
(नक्की वाचा- पुन्हा एकदा ‘चांद नवाब'! पाकिस्तानी रिपोर्टरचा ‘माझं हृदय धडधडतंय' Video Viral)
Andheri W Aaram Nagar Autorickshaw thief removes 4 sewer grating & escapes swiftly in minutes@mybmc design needs to be redone so that it cannot be stolen so swiftly, endangering pedestrians lives & safety
— ANDHERI LOKHANDWALA OSHIWARA CITIZEN'S ASSOCIATION (@AndheriLOCA) August 28, 2025
Please book thieves under stringent BNS sections
Loss of crores of tax… pic.twitter.com/oOXm4fKNwm
चोरीमुळे पादचाऱ्यांसाठी मोठा धोका निर्माण झाला आहे. पावसाळ्यात किंवा रात्रीच्या वेळी उघड्या मॅनहोलमुळे अपघातांची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे मॅनहोलच्या जाळ्यांची रचना अशी करायला हवी, की त्या सहजपणे काढता येणार नाहीत.
(नक्की वाचा : PM Modi : ट्रम्प यांचा मोदींना चार वेळा कॉल, पण मोदींनी घेतला नाही; ‘या' कारणामुळे घेतला निर्णय?)
मुंबईकरांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या चोरांवर कठोर कारवाईची मागणी देखील होत आहे. या चोरीमुळे केवळ सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले नाही, तर करोडो रुपयांच्या करदात्यांच्या पैशांचाही अपव्यय झाला आहे. अशा चोरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला असून, अशा चोरांना पकडून त्यांना कायद्यानुसार शिक्षा देण्याची गरज आहे, जेणेकरून भविष्यात अशा घटना पुन्हा घडणार नाहीत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world