
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर (CSMIA) डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलण्यात आलं आहे. मुंबई विमानतळ येथून प्रवास करणारे प्रवासी मल्टी-लेव्हल कार पार्किंग (MLCP) मध्ये प्रवेश करण्यासाठी आणि बाहेर पडण्यासाठी स्वयंचलित डिजिटल पेमेंट प्रणालीचा वापर करू शकतात. या कॅशलेस पेमेंट प्रक्रियेचा उद्देश पेमेंट सिस्टम सुलभ करणे, प्रतीक्षा वेळ कमी करणे आणि वापरकर्त्यांना त्रास-मुक्त पार्किंग अनुभव देणे हा आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
कॅशलेस उपक्रमामुळे भारत सरकारच्या डिजिटल इंडिया उपक्रमाला देखील चालना मिळते. MLCP वापरकर्त्यांना विविध डिजिटल पर्याय जसे की मोबाइल वॉलेट, डेबिट/क्रेडिट कार्ड, UPI किंवा इतर ऑनलाइन पेमेंट पद्धतीने पार्किंगसाठीचे पैसे देता येणार आहेत. MLCP वरील सर्व मार्गांवर FASTag काउंटरची देखील सुविधा आहे. जेणेकरून प्रवेश आणि बाहेर जाण्याचा वेग वाढेल. CSMIA च्या मल्टी-लेव्हल कार पार्किंग (MLCP) मधील FASTag वापरकर्ते स्वयंचलित पार्किंग प्रक्रियेचा वापर करु शकतात. विमानतळ प्रवाशांना नवीन डिजिटल पेमेंट पर्यायांचा अवलंब करण्यास प्रोत्साहित करत आहे.
(नक्की वाचा- LPG ते FD! 1 मार्चपासून होणार 6 महत्त्वाचे बदल, वाचा तुमच्या खिशावर काय होणार परिणाम?)
सध्या, CSMIA च्या MLCP मध्ये, 66 टक्के वापरकर्ते FASTag ला त्यांचा प्राथमिक पेमेंट मोड म्हणून निवडतात. तर 10-15 टक्के वापरकर्ते UPI, क्रेडिट किंवा डेबिट कार्ड पर्यायांची निवड करतात, तर 5 टक्के वापरकर्ते प्री-बुकिंग पार्किंग स्लॉटचा वापर करतात. सीएसएमआयएचे उद्दिष्ट भागधारकांसोबत भागीदारी करून आणि ग्राहकांना स्वयंचलित डिजिटल पेमेंट पद्धतींचा अवलंब करण्यास प्रोत्साहित करून रोख रकमेचा वापर कमी करणे हे आहे. मात्र जे प्रवासी अजूनही रोखीने पैसे भरण्याची निवड करतात त्यांनी ते नियुक्त केलेल्या केंद्रीय पेमेंट स्टेशनवरच करणे आवश्यक आहे.
(नक्की वाचा : अदाणी इलेक्ट्रिसिटी मुंबई बनली देशातील पहिल्या क्रमांची वीज कंपनी! ऊर्जा मंत्रालयाकडून शिक्कामोर्तब)
CSMIA च्या प्रवक्त्यांनी यावर म्हटलं की, “मुंबई विमानतळ स्मार्ट एअरपोर्ट सोल्यूशन्समध्ये नवीन बेंचमार्क सेट करत आहे, डिजिटल इनोव्हेशनद्वारे कार्यक्षमता, पारदर्शकता आणि टिकाऊपणा वाढवत आहे. CSMIA चे MLCP मधील डिजिटल पेमेंट सिस्टीमकडे वळणे हे आधुनिक, कार्यक्षम पार्किंग अनुभव देण्याच्या तिची बांधिलकी दर्शवते.”
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world