जाहिरात

Mumbai Pune News: मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरून 'या' 3 दिवशी प्रवास करणार असाल, तर त्या आधी ही बातमी वाचा

यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावरील डोंगरगाव-कुसगांव इथं बांधण्यात येणाऱ्या पुलाचे गडर्स बसविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

Mumbai Pune News: मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरून 'या' 3 दिवशी प्रवास करणार असाल, तर त्या आधी ही बातमी वाचा
मुंबई:

मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर तीन दिवस ट्रॉफिक ब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळे मुंबईहून पुण्याला जाणाऱ्या आणि पुण्याहून मुंबईला येणाऱ्यांसाठी ही महत्वाची बातमी आहे. हा ट्राफिक ब्लॉक 22 जानेवारी ते 24 जानेवारीपर्यंत असा तीन दिवस असणार आहे. त्यामुळे वाहतूकीच्या व्यवस्थेत काही बदल करण्यात आले आहे. हा ब्लॉक दुपारी 12 ते दुपारी 3 वाजेपर्यंत असेल. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावरील डोंगरगाव-कुसगांव इथं बांधण्यात येणाऱ्या पुलाचे गडर्स बसविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. हे काम 22,23 आणि 24 जानेवारीला करण्यात येणार आहे. या तीन ही दिवशी दुपारी 12.00 ते 15.00 या कालावधीमध्‍ये हे केले जाणार आहे. हे काम सुरू असताना मुंबईकडून पुण्याकडे जाणारी, पुणे वाहिनीवरील वाहतूक द्रुतगती मार्गाच्या  वळवण ते वरसोली टोल नाका (राष्ट्रीय महामार्ग क्र.48) येथून देहूरोड मार्गे पुण्याकडे वळविण्यात येणार आहे.

ट्रेंडिंग बातमी -  त्या हॉटेलच्या किचनमध्ये शिजत होतं चिकन, अन् बाहेरच्या टेबलावर संतोष देशमुखांच्या हत्येचा कट

तर याच कालावधीत पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावरुन सुरु राहणार आहे. ब्लॉक काळातील तिन्ही दिवस दुपारी 15.00 वाजेनंतर मुंबईकडून पुण्याकडे जाणारी वाहतूक पुन्हा द्रुतगती मार्गाच्या पुणे वाहिनीवरुन सोडण्यात येईल. त्यामुळे दुपारी 12 ते 3 कालावधीत प्रवास करणार असाल तर या गोष्टीं लक्षात ठेवा. नाही तर मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो. 

ट्रेंडिंग बातमी - Exclusive : "अशी भांडणं आम्ही शाळेत लावायचो", वडेट्टीवार-राऊतांच्या आरोपांना उदय सामंतांचं उत्तर

या अनुषंगाने द्रुतगती मार्गावरील प्रवाशांनी नियोजन करावे असं आवाहन करण्यात येत आहे. वरील तीन दिवस सदर कालावधीत द्रुतगती मार्गावरील पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांनी वरील प्रमाणे मार्गाचा उपयोग करावा. तसेच वरील कालावधी दरम्यान द्रुतगती मार्गावरील वाहनचालकांना काही अडचण असल्यास त्यांनी मदतीसाठी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाच्या नियंत्रण कक्षाचा दूरध्वनी क्रमांक- 9822498224  किंवा महामार्ग पोलीस विभागाच्या 9833498334 या क्रमांकावर सपंर्क साधावा असं सांगण्यात आलं आहे. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com