जाहिरात

CCTV Footage: चालता चालता काळाने गाठलं! मुंबईत मॅनहोलमध्ये पडून व्यक्तीचा तडफडून मृत्यू

Mumbai News: मुंबईतील साकीनाका खैरनी रोड परिसरात मोबाईलवर बोलत असताना एका उघड्या मॅनहोलमध्ये पडून ४५ वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

CCTV Footage: चालता चालता काळाने गाठलं! मुंबईत मॅनहोलमध्ये पडून व्यक्तीचा तडफडून मृत्यू

ऋतिक गणकवार, मुंबई

मुंबईत मान्सूनच्या सुरुवातीलाच प्रशासकीय यंत्रणेचा आणि खाजगी कंत्राटदारांचा ढिसाळ व जीवघेणा कारभार समोर आला आहे. साकीनाका खैरनी रोड परिसरात एका उघड्या मॅनहोलमध्ये पडल्यामुळे व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अस्लम अन्सारी असं मृत व्यक्तीचं नाव आहे.

पावसाळ्यात मॅनहोल उघडे ठेवल्यामुळे झालेल्या या दुर्घटनेनंतर मुंबई महानगरपालिका  आणि संबंधित कंत्राटदाराविरुद्ध स्थानिक जनतेतून प्रचंड संतापाची लाट उसळली आहे.

मोबाईलवर बोलत असताना घडली दुर्घटना

प्रत्यक्षदर्शी आणि प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, साकीनाका येथील खैराणी रोडवरील 'सन्मान हॉटेल'जवळून अस्लम अन्सारी हे जात होते. यावेळी ते मोबाईलवर बोलण्यात व्यस्त असताना, त्यांचे लक्ष रस्त्यावरील उघड्या मॅनहोलकडे गेले नाही आणि ते थेट त्यात कोसळले.

(नक्की वाचा-  Shocking News: उकळता चहा प्यायल्याने 12 वीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू; डॉक्टरांनी सांगितलं धक्कादायक कारण)

या मॅनहोलच्या ठिकाणी एका खाजगी कंत्राटदाराकडून देखभालीचे काम सुरू होते. काम सुरू असताना सुरक्षेचे कोणतेही नियम न पाळता मॅनहोलचे झाकण पूर्णपणे उघडे ठेवण्यात आले होते. पावसामुळे मॅनहोलमधील पाण्याचा वेग अत्यंत जास्त होता. त्यामुळे तिथेच या व्यक्तीचा बुडून मृत्यू झाला. 

(नक्की वाचा-  Hingoli News: जमिनीतून गूढ आवाज अन् क्षणात हादरे! हिंगोलीतील नागरिक दहशतीत)

घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन, मुंबई अग्निशामक दल, स्थानिक पोलीस, आणि 108 रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या होत्या.  स्थानिक प्रशासन आणि पोलिसांच्या  अथक प्रयत्नांनंतर या व्यक्तीला बाहेर काढण्यात आले मात्र दुर्दैवाने तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.

CCTV Footage
 

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com