
कोल्हापुरातून एक धक्कादाय घटना समोर आली आहे. ही घटना कोल्हापुरच्या कळंबा कारागृहातून आली आहे. कळंबा जेले हे विवीध कारणांसाठी नेहमीच चर्चेत राहीले आहे. कधी या जेलमध्ये गांजा सापडतो, तर कधी पोलिसच कैद्यांना गांजा पुरवता, मोबाईल फोन सापडल्याच्या घटना ही इथे घडल्या आहे. आता तर या जेलमध्ये चक्क कैद्यामध्ये राडा होवून एकाचा खुन करण्यात आला आहे. खुन झालेला आरोपी हा 1993 स्फोटातील आरोपी होता.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
कोल्हापूरच्या कळंबा मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांच्या दोन गटामध्ये आज सकाळी वाद झाला. या वादाचे रूपांतर मारहाणीत झालं. या मारहाणीत 70 वर्षीय आरोपीचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुन्ना उर्फ मोहम्मद अली खान उर्फ मनोज कुमार भवरलाल गुप्ता असे खून झालेल्या कैद्याचे नाव आहे. ठार झालेला आरोपी मुन्ना हा 1993 च्या साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी होता.
हेही वाचा - 12 वी पास झाल्याचा आनंद, फिरण्यासाठी 'ती' उत्तर भारतात गेली, घात झाला
कोल्हापूरच्या कळंबा मध्यवर्ती कारागृहात गेल्या काही दिवसांपासून मोबाईल तसेच अंमली पदार्थ सापडत असल्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे . त्यामुळे कळंबा मध्यवर्ती कारागृहातील भोंगळ कारभारावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. अशातच आता आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे.
हेही वाचा - अरूणाचल प्रदेशातून अजित पवारांसाठी आनंदवार्ता, विधानसभा निवडणुकीत काय झालं?
कोल्हापूरच्या कळंबा मध्यवर्ती कारागृहात 1993 च्या साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी म्हणून गेल्या 12 ते 13 वर्षांपासून मुन्ना उर्फ मोहम्मद अली खान हा शिक्षा भोगत होता. यावेळी जेलमधल्या दुसऱ्या गटातील अन्य पाच जणांच्यामध्ये झालेल्या मारहाणीत मुन्ना उर्फं मोहम्मद अली खान या कैद्याच्या डोक्यात ड्रेनेजवरील लोखंडी झाकण घालत खून करण्यात आला.
याबाबतच्या अधिक माहितीनुसार, मुन्ना उर्फ मोहम्मद अली खान उर्फ मनोज कुमार भवरलाल गुप्ता हा मुंबईतील 1993 च्या साखळी बॉम्बस्फोटामधील आरोपी आहे. तो सध्या कळंबा कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. आज सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास कारागृहातील हौदावर आंघोळ करण्यासाठी गेला होता. यावेळी येथील न्यायालयीन बंदी असलेले आरोपी प्रतीक उर्फ पिल्या सुरेश पाटील, दीपक नेताजी खोत, संदीप शंकर चव्हाण, ऋतुराज विनायक इनामदार, सौरभ विकास सिद्ध या पाच आरोपींनी मुन्ना उर्फ मोहम्मद अली खान याला जबर मारहाण केली. यावेळी यातील एका आरोपीने ड्रेनेजवरील लोखंडी झाकण डोक्यात घालून त्याचा खून केला. या घटनेनंतर कळंबा कारागृहात एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस कळंबा कारागृहात दाखल झाले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world