जाहिरात

Pimpri Chinchwad News: पिंपरी-चिंचवडमध्ये मविआ फुटली! शरद पवार गटाने दगाफटका केल्याचा ठाकरे गटाचा आरोप

गौतम चाबुकस्वार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, "आमची शरद पवार गटासोबत जागावाटपाची चर्चा सुरू होती. मात्र, त्यांनी आमची फसवणूक केली आहे.

Pimpri Chinchwad News: पिंपरी-चिंचवडमध्ये मविआ फुटली! शरद पवार गटाने दगाफटका केल्याचा ठाकरे गटाचा आरोप

Pimpri Chinchwad Election: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या रणांगणात महाविकास आघाडीत मोठी फूट पडली आहे. जागावाटपाच्या चर्चेत असलेल्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने शेवटच्या क्षणी 'दगा' दिला असून त्यांनी अजित पवार गटाशी हातमिळवणी केल्याचा गंभीर आरोप शिवसेना (UBT) जिल्हाप्रमुख गौतम चाबुकस्वार यांनी केला आहे. यामुळे शहरातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत.

नेमका आरोप काय?

गौतम चाबुकस्वार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, "आमची शरद पवार गटासोबत जागावाटपाची चर्चा सुरू होती. मात्र, त्यांनी आमची फसवणूक केली आहे. मविआचा 'प्लॅन ए' फोल पाडण्यासाठी त्यांनी छुप्या पद्धतीने अजित पवार गटाशी घरोबा केला. हा मविआला मोठा धक्का असून आम्ही हे सहन करणार नाही."

(नक्की वाचा- Santosh Deshmukh Case: "मला बोलायचंय", कोर्टाने दोनच शब्दात वाल्मीक कराडचं तोंड केलं बंद, सुनावणीत काय घडलं?)

ठाकरे गटाचा 'प्लॅन बी' आणि 128 जागांचा निर्धार

शरद पवार गटाने साथ सोडल्याने आता ठाकरे गटाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. ठाकरे गट आता शरद पवार गटाला वगळून मित्रपक्षांसह सर्व 128 जागांवर उमेदवार उभे करणार आहे. "आमचा 'प्लॅन बी' आता तयार आहे. आज संध्याकाळपर्यंत आमच्या अधिकृत उमेदवारांची यादी प्रसिद्ध होईल," असे चाबुकस्वार यांनी स्पष्ट केले.

(नक्की वाचा-  Pune Traffic: भीमा-कोरेगाव शौर्य दिनासाठी प्रशासन सज्ज, बुधवारपासून वाहतुकीत मोठे बदल, चेक करा पर्यायी मार्ग)

या आरोप-प्रत्यारोपामुळे आता पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप-शिवसेना महायुतीविरुद्ध, दोन्ही राष्ट्रवादी आणि आता स्वतंत्र लढणारा ठाकरे गट अशी बहुरंगी लढत पाहायला मिळणार आहे. शरद पवार गट आणि अजित पवार गट पुन्हा एकत्र आल्याच्या या चर्चेने कार्यकर्त्यांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. जर हे आरोप खरे ठरले, तर आगामी निवडणुकीत ठाकरे गटाला एकट्याने झुंज द्यावी लागणार आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com