
प्रवीण मुधोळकर, नागपूर
नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यात एका दुर्दैवी घटनेत वीज कोसळून आई आणि मुलाचा मृत्यू झाला आहे. मांढळजवळील वग गावात ही घटना घडली असून, संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
मृत्यू झालेल्यांमध्ये सुनिता दशरथ मेश्राम (वय 45) आणि त्यांचा मुलगा धम्मशिल दशरथ मेश्राम (वय 25) यांचा समावेश आहे. दोघेही शेतात फवारणीचे काम करून मोटरसायकलने घरी परत येत असताना, अचानक जोरदार पाऊस सुरू झाला आणि त्याच वेळी त्यांच्यावर वीज कोसळली.
(नक्की वाचा- Nagpur News: देवाच्या दारात रक्तरंजित थरार! प्रेयसीवर सपासप वार; नागपुरमध्ये भयंकर घडलं)
वीज कोसळल्याने आई आणि मुलगा गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी तात्काळ त्यांना जवळच्या मांढळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. मात्र, केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासणीनंतर मृत घोषित केले.
(Nagpur Crime: दारुमुळे वडिलांचा मृत्यू! बदला घेण्यासाठी मुलाचा भलताच प्लॅन, बारमध्ये शिरायचा अन्....)
या दुर्दैवी घटनेमुळे मेश्राम कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गावकऱ्यांनी सरकारकडे या कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world