जाहिरात

Nashik Crime News : पंचवटीतील तरुणाच्या हत्येप्रकरणी शिक्षिकेला अटक; हत्येचं कारण ऐकून सर्वांनाच धक्का बसला

Nashik News : सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्याचा मुलगा असणारा गगन कोकाटे याचे शेजारी राहणाऱ्या एका शिक्षिकेसोबत अनैतिक संबंध होते. दोघांचीमधील जवळीक जास्त वाढल्यामुळे गगनकडून महिलेला त्रास होत होता.

Nashik Crime News : पंचवटीतील तरुणाच्या हत्येप्रकरणी शिक्षिकेला अटक; हत्येचं कारण ऐकून सर्वांनाच धक्का बसला

किशोर बेलसरे, नाशिक

नाशिकच्या पंचवटी परिसरात युवकाची निर्घृणपणे हत्या झाल्याची घटना बुधवारी उघडकीस आली होती. पंचवटी परिसरातील मेरी कंपाऊंडमध्ये ही हत्या झाली होती. गगन आकाश कोकाटे असं युवकाचं नाव होतं. अवघ्या काही तासातच पोलिसांनी या हत्येचा छडा लावला आहे. या हत्येप्रकरणी पोलिसांना मृत गगनच्या शेजारीच राहण्याच्या एका शिक्षिकेला अटक केलं आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्याचा मुलगा असणारा गगन कोकाटे याचे शेजारी राहणाऱ्या एका शिक्षिकेसोबत अनैतिक संबंध होते. दोघांचीमधील जवळीक जास्त वाढल्यामुळे गगनकडून महिलेला त्रास होत होता. सातत्याने होणाऱ्या त्रासाला कंटाळून शिक्षिकेने गगनचा कायमचं संपवण्याचं ठरवलं. यासाठी या शिक्षिकेने दोन लाखांची सुपारी देऊन गगनची हत्या केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. 

या शिक्षिकेने शाळेतील एका विद्यार्थ्यांच्या मित्रांना सोबत घेत दोन लाखांची सुपारी दिली. यासाठी तिने गगनला पंचवटीतील मेरी कंपाऊंडमध्ये मध्यरात्री बोलावून घेतले. तिथेच गगनची तीक्ष्ण हत्याराने हत्या केली. या हत्येमध्ये महिला शिक्षिकासुद्धा सहभागी होती. या प्रकरणी पंचवटी पोलिसांनी शिक्षकेसह एकूण 5 संशयित आरोपींना  ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरु आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Switch To Dark/Light Mode
Previous Article
Walk : अतिरिक्त चरबी अन् आजारांना म्हणा बाय बाय, 30 दिवसांचा प्रभावी Walking Plan!
Nashik Crime News : पंचवटीतील तरुणाच्या हत्येप्रकरणी शिक्षिकेला अटक; हत्येचं कारण ऐकून सर्वांनाच धक्का बसला
CIDCO Navi mumbai  Lottery CIDCO New Lottery Announcement, Why Buy a CIDCO Home
Next Article
सिडकोचेच घर का खरेदी कराल? नव्या लॉटरीत 'ही' आहे खास गोष्ट