जाहिरात

Nashik News: नाशिक हादरले! ट्रकने 100 फूट फरफटत नेले अन् पिकअप व्हॅनला लागली भीषण आग, 4 जणांचा जळून मृत्यू

Nashik News: नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील पंचाळे-शहा रोडवर ट्रक आणि पिकअप व्हॅनच्या भीषण अपघातात चार जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची भीषण घटना समोर आली आहे.

Nashik News: नाशिक हादरले! ट्रकने 100 फूट फरफटत नेले अन् पिकअप व्हॅनला लागली भीषण आग, 4 जणांचा जळून मृत्यू
"Nashik News: भीषण अपघातात 4 जण जिवंत जळले"
NDTV Marathi

- राहुल वाघ, प्रतिनिधी

Nashik News: नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात शुक्रवारी (10 एप्रिल) रात्री एक भीषण आणि हृदयद्रावक घटना घडली. पंचाळे-शहा रोडवर ट्रक आणि पिकअप व्हॅनचा भीषण अपघात होऊन भीषण आग लागली. या आगीत पिकअपमधील चार जणांचा अक्षरशः कोळसा झाला. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.

अपघात कसा झाला?

मिळालेल्या माहितीनुसार, पंचाळे गावातील एक आदिवासी कुटुंब आपल्या नातेवाईकांकडे जागरण गोंधळाच्या कार्यक्रमासाठी गेले होते. रात्री उशीरा हा धार्मिक कार्यक्रम आटोपून हे सर्वजण पिकअप व्हॅनने (एमएच 15- जीव्ही 8834) आपल्या घराकडे परतत होते. पंचाळे गावापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या शहा रोडवर समोरून येणाऱ्या अशोक लेलँड ट्रकने पिकअप व्हॅनला जोरदार धडक दिली आणि पिक व्हॅनला भीषण आग लागली.

(नक्की वाचा: Pune News: 'पुण्यातील पाषाण तलावात 4-5 दिवसांपासून...' सुप्रिया सुळेंनी व्यक्त केली मोठी भीती VIDEO VIRAL)

ट्रकने पिकअप व्हॅनला 100 फूट फरफटत नेले अन्...

हा अपघात इतका भीषण होता की, ट्रकने पिकअप व्हॅनला तब्बल 100 फूट अंतरापर्यंत फरफटत ओढत नेले. घर्षणामुळे टायरने पेट घेतला आणि अवघ्या काही क्षणांत संपूर्ण पिकअप व्हॅन आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. पिकअपमध्ये बसलेल्या लोकांना बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही, त्यापूर्वीच भीषण दुर्घटना घडली. 

(नक्की वाचा: सुदैवाने अपघात टळला, पण...' Chhagan Bhujbal यांच्या हेलिकॉप्टर लँडिंग प्रकरणावर रोहित पवारांची खळबळजनक पोस्ट)

चार जणांचा जागीच झाला मृत्यू

वाहनाने पेट घेतल्याने त्यातील चारही जणांचा जागीच होरपळून मृत्यू झाला. आगीची तीव्रता इतकी भीषण होती की, स्थानिकांना मदत करेपर्यंत वाहनाचा कोळसा झाला होता. धार्मिक कार्यक्रमावरून परतताना काळाने घाला घातल्याने पंचाळे गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.  
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com