जाहिरात

'सुदैवाने अपघात टळला, पण...' Chhagan Bhujbal यांच्या हेलिकॉप्टर लँडिंग प्रकरणावर रोहित पवारांची खळबळजनक पोस्ट

Chhagan Bhujbal Helicopter Landing: मंत्री छगन भुजबळ यांचे हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये उतरवल्याने आमदार रोहित पवार यांनी संताप व्यक्त केला आहे. सरकारी विमाने आणि हेलिकॉप्टर्सच्या सुरक्षेबाबत त्यांनी गंभीर प्रश्नही उपस्थित केले आहेत.

'सुदैवाने अपघात टळला, पण...' Chhagan Bhujbal यांच्या हेलिकॉप्टर लँडिंग प्रकरणावर रोहित पवारांची खळबळजनक पोस्ट
"Chhagan Bhujbal Helicopter Landing: छगन भुजबळ यांच्या हेलिकॉप्टर लँडिंग प्रकरणावर रोहित पवार यांचे गंभीर प्रश्न उपस्थित केले"
IANS English And NDTV Marathi

Chhagan Bhujbal Helicopter Landing:  राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या हेलिकॉप्टरचे हेलिपॅडऐवजी अचानक एका पार्किंगच्या जागेत लँडिंग करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार पक्ष) आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. "आज सुदैवाने मोठा अपघात टळला, पण शासनाने एवढा हलगर्जीपणा करणे योग्य नाही," अशा शब्दांत रोहित पवारांनी गंभीर मुद्दा मांडला आहे. 

रोहित पवार यांनी व्यक्त केली भीती

राशप आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलंय की, "मा. छगन भुजबळ साहेब यांच्यासारख्या मोठ्या नेत्याचं हेलीकॉप्टर हेलिपॅडऐवजी अचानक एका पार्किंगमध्ये उतरवण्यात आल्याची बाब ही अतिशय गंभीर आहे. त्यामुळंच मी सातत्याने सांगतोय की, महत्त्वाच्या व्यक्तींनी प्रवास करताना काळजी घ्यायला हवी. अनेक विमानं आणि हेलिकॉप्टरर्समध्ये देखभालदुरुस्तीसह इतरही अनेक त्रुटी आहेत. आज सुदैवाने अपघात टळला पण म्हणून शासनानेही एवढा हलगर्जीपणा करणं योग्य नाही. विमान, हेलीकॉप्टर्सने प्रवास करताना सरकार यापुढं काळजी घेईल, ही अपेक्षा!"

राशप आमदार रोहित पवार यांची पोस्ट 

(नक्की वाचा: VIDEO: मोठा अपघात टळला! छगन भुजबळांच्या हेलिकॉप्टरचे कार पार्किंगमध्ये लँडिंग, पायलटकडून गंभीर चूक)व्हीआयपी सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

पायलटच्या चुकीमुळे हा गंभीर प्रकार घडल्याचे सांगण्यात येत असून छगन भुजबळ मोठ्या अपघातातून थोडक्यात बचावले आहेत. दरम्यान राज्यातील महत्त्वाच्या नेत्यांच्या विमान प्रवासादरम्यान यापूर्वीही अनेक तांत्रिक बिघाडाच्या घटना समोर आल्या आहेत. मात्र आता थेट पार्किंगमध्ये हेलिकॉप्टर उतरवण्याची वेळ आल्याने व्हीआयपी सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. विमान आणि हेलिकॉप्टरची वेळेवर देखभाल होते की नाही, हा मूळ प्रश्न आता या निमित्ताने पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. 

छगन भुजबळ यांचे विमान कसे लॅण्ड करण्यात आले? पाहा VIDEO

Listen to the latest songs, only on JioSaavn.com