Navi Mumbai Airport: नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनाबद्दल मोठी अपडेट, अभूतपूर्व कनेक्टीव्हिटी गेम चेंजर ठरणार

Navi Mumbai Airport:1160 हेक्टरपेक्षा जास्त जमिनीवर पसरलेले हे विमानतळ देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय अशा दोन्ही वाहतुकीसाठी महत्त्वाचे ठरेल.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

Navi Mumbai Airport: बहुप्रतीक्षित अशा नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची (NMIA) उद्घाटनाची तारीख जवळ येत चालली आहे.  सप्टेंबर अखेरीस या विमानतळाचे उद्घाटन होण्याची दाट शक्यता असून याच महिन्यापासून या विमानतळावरून विमाने झेपावण्यास सुरू होतील असे सांगितले जात आहे. मुंबई विमानतळ हे अत्यंत व्यस्त विमानतळ बनले आहे. या विमानतळावरील सेवांचा विस्तार करणे कठीण झाले असल्याने नव्या विमानतळाची निकडीची गरज भासत होती. नवी मुंबई विमानतळ ही गरज पूर्ण करणारे ठरणार आहे. 

नक्की वाचा: Honda Activa, TVS Jupiter सह सर्वच स्कूटर स्वस्त होणार; जीएसटी दर कपातीनंतर किती असेल किंमत?

उलवे, पनवेलजवळ भव्य अशा जागेवर उभारलेले हे विमानतळ जागतिक दर्जाच्या सेवा-सुविधा पुरवणारे विमानतळ असून 1,160 हेक्टरपेक्षा जास्त भूभागावर उभारलेले हे विमानतळ देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय अशा दोन्ही वाहतुकीसाठी महत्त्वाचे ठरेल. पूर्ण क्षमतेने विकसित झाल्यावर, वर्षाला 9 कोटी प्रवाशांना हाताळण्याची क्षमता या विमानतळाची असेल. या प्रकल्पामुळे सध्याच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील (CSMIA) ताण कमी होणार आहे. विशेषतः पुणे, नाशिक, रायगड आणि कोकण पट्ट्यातून येणाऱ्या प्रवाशांसाठी हे विमानतळ सोयीचे ठरेल, ज्यामुळे ठाणे, नवी मुंबई, रायगड, कोकण, पुण्यासह पश्चिम महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाला अधिक बळ मिळेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.

नक्की वाचा: हडपसरवासीयांची कोणतीही समस्या Whatsapp वर नोंदवता येणार, अजित पवार ऑन द स्पॉट सोडवणार

या विमानतळापर्यंत पोहोचण्यासाठी सध्या रस्ते वाहतूक हाच मुख्य पर्याय आहे. दक्षिण मुंबईतून सायन-पनवेल महामार्गाने इथे पोहोचता येते, तर पश्चिम उपनगरांतून येणाऱ्यांसाठी ईस्टर्न फ्रीवे पर्याय उपलब्ध आहे. मात्र, इथे पोहोचण्यासाठी सगळ्यात वेगवान आणि सुलभ रस्ता म्हणजे अटल सेतू मार्ग  मुंबई ट्रान्स हार्बर लिंकने या विमातळावर पोहोचणे सोपे झाले आहे.  22 किलोमीटर लांबीचा हा पूल शिवडी आणि न्हावा शेवाला जोडणार आहे. या पुलामुळे मुंबई आणि नवी मुंबई ही दोन शहरे कल्पनाही केली नव्हती इतकी जवळ आली आहेत.

नक्की वाचा: 'लाडकी बहीण'चे पैसे खात्यात कधी जमा होणार? अदिती तटकरेंनी दिली माहिती

मुंबई आणि नवी मुंबईचे विमानतळ मेट्रो मार्गाने जोडण्याची संपकल्पना प्रत्यक्षात आणण्यास सुरूवात झाली आहे.  याशिवाय MSRTC (महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ) देखील ठाणे, दादर, वाशी आणि पनवेल येथून थेट विमानतळासाठी एक्सप्रेस बस सेवा सुरू करण्याचा विचार करत आहे. नवी मुंबईतील विमानतळ उभारत असताना अनेक आव्हानांचा सामना करावा लागला होता. या सगळ्या आव्हानांवर मात करत हे विमानतळ उभे राहीले असून हे विमानतळ खऱ्या अर्थाने गेम चेंजर ठरणार आहे. या विमानतळामुळे केवळ हवाई प्रवास सुखकर, सोईस्कर होईल असे नाही तर खारघर, उलवे आणि पनवेलमध्ये अनेक व्यवसायिक पार्क, गृहनिर्माण प्रकल्प आणि लॉजिस्टिक्स हब तयार होत असून यामुळे नवी मुंबईच्या रहिवाशांना घराच्या जवळच नोकरीच्या अपार संधीही उपलब्ध होतील.

Advertisement
Topics mentioned in this article