
राहुल कांबळे, प्रतिनिधी
Navi Mumbai International Airport: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाचा पाहणी दौरा केला. या वेळी त्यांनी प्रकल्पाच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेतला. त्याचबरोबर या प्रकल्पाच्या पुढील टप्प्यांबाबत आवश्यक सूचना केल्या. "नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची भौतिक प्रगती सध्या 94 टक्क्यांवर पोहोचली आहे. बाहेरील सिलिंगसारखी काही कामं अजून शिल्लक आहेत आणि ती वेगाने पूर्ण करणे आवश्यक आहे, असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
कसं असेल नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ?
या विमानतळावर आधुनिक आणि स्मार्ट सुविधा देण्यात येणार असून त्यात 360 डिग्री बॅगेज बारकोड स्कॅनिंग सिस्टीम असणार आहे. "या ठिकाणी बॅगेज हाताळणी जगातील सर्वाधिक वेगवान असावी, असा आमचा प्रयत्न आहे," असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
मुंबईच्या विमानतळापेक्षा अधिक मोठ्या क्षमतेचा असलेला हा विमानतळ 37 मेगाहट्स ग्रीन झोनने सुसज्ज असेल. या ठिकाणी ग्रीन लेव्हल एअरपोर्टची संकल्पना राबवण्यात येत असून पर्यावरणपूरक आणि ऊर्जा कार्यक्षमतेवर भर दिला जात आहे.
( नक्की वाचा: Vadhuvan Airport: वाढवण किनारी विमानतळ या वर्षी होणार सुरू, पुण्याजवळही नवे विमानतळ उभारणार; CM फडणवीसांनी दिली मोठी माहिती )
प्रवाशांच्या सुलभतेसाठी चारही दिशांनी मेट्रो, रेल्वे आणि वॉटर ट्रान्सपोर्टशी थेट संपर्क साधता येईल, अशी व्यवस्था करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे बॅगेज चेक-इन सुविधा शहरातच उपलब्ध असेल.
"हा विमानतळ प्रवाशांसाठी एक आधुनिक, स्मार्ट आणि प्रगत दर्जाचा असेल. अंडरग्राऊंड मेट्रोमुळे कोणालाही पायी चालावं लागणार नाही, ही एक क्रांतिकारी सुविधा असेल," अशी माहिती फडणवीस यांनी दिली.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world