Ajit Pawar Plane Crash : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी रक्ताने एक पत्र लिहिण्यात आलं आहे. असिफ रशीद पटेल नावाच्या एका कार्यकर्त्याने स्वत:च्या रक्ताने हे पत्र लिहिल्याचं सांगितलं जात आहे. या पत्रात असिफने एक महत्त्वाची मागणी केली आहे.
राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताची निष्पक्ष चौकशी व्हावी आणि सत्य समोर यावे, या मागणीसाठी त्यांच्या एका कार्यकर्त्याने टोकाची भूमिका घेतली आहे. असिफ रशीद पटेल या कार्यकर्त्याने आपल्या रक्ताने पत्र लिहून थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चौकशीची मागणी केली. या असामान्य आंदोलनामुळे स्थानिक पातळीपासून सोशल मीडियापर्यंत चर्चेला जोर आला आहे. असिफ पटेल यांचं म्हणणं आहे की, अजित दादांच्या विमान अपघाताबाबत अद्याप अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत आणि त्यामुळे या प्रकरणाची सखोल, पारदर्शक आणि निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी त्यांची मागणी आहे. मुख्यमंत्री कार्यालयाकडून या पत्राला कोणती प्रतिक्रिया मिळते, याकडे आता राज्याचे लक्ष लागले आहे.
विमान अपघात तपास ब्युरोचा अहवाल आला समोर...
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताला आता एक महिना पूर्ण झाला असून, या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र अजूनही सुन्न आहे. या भीषण अपघाताच्या कारणांचा शोध घेणाऱ्या विमान अपघात तपास ब्युरोने (AAIB) आपला 22 पानांचा प्राथमिक अहवाल आता प्रसिद्ध केला आहे. या अहवालातून अपघाताच्या वेळची परिस्थिती आणि तांत्रिक त्रुटींबाबत अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world