जाहिरात

लोकसभेत पराभूत तरीही भाजपकडून बळ; नवनीत राणांबद्दल या बड्या नेत्याचं विधान चर्चेत

गेल्या काही दिवसांपासून नवनीत राणा व रवी राणा चांगले अ‍ॅक्शन मोडवर आल्याचे पाहायला मिळत आहे. 

लोकसभेत पराभूत तरीही भाजपकडून बळ; नवनीत राणांबद्दल या बड्या नेत्याचं विधान चर्चेत
अमरावती :

शुभम बायस्कार, प्रतिनिधी

अमरावती लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराकडून पराभूत झालेल्या भाजप नेत्या माजी खासदार नवनीत राणा या पुन्हा भाजप-महायुतीच्या खासदार होणार, असे संकेत भाजपच्या पक्ष नेतृत्वाकडून देण्यात आल्याने राणा दांपत्याच्या अशा पल्लवीत झाल्या आहेत. 'नवनीत राणा या खासदार होणारच त्याची चिंता कोणीही करू नये' असा हल्लाबोल देखील भाजपच्या बड्या नेत्याने विरोधकांवर केल्याने पराभवानंतर देखील नवनीत राणांना भाजपने बळ देण्यास सुरुवात केली असल्याचं दिसून येत आहे.  

यावर्षी अमरावती लोकसभा मतदारसंघात अत्यंत चुरशीचा तिरंगी लढत झाली होती. महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा, महाविकास आघाडीचे बळवंत वानखडे व प्रहार पक्षाचे दिनेश बूब यांच्यामध्ये ही लढत झाली. यामध्ये नवनीत राणा यांचा अनपेक्षित व धक्कादायक पराभव झाल्याने विरोधकांनी मोठ्याप्रमाणात जल्लोष साजरा केला होता. निवडणूक निकाल लागल्यानंतर नवनीत राणा यांनी सार्वजनिक प्लॅटफॉर्मवर येणे टाळले होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून नवनीत राणा व रवी राणा चांगले अ‍ॅक्शन मोडवर आल्याचे पाहायला मिळत आहे. 

नक्की वाचा - ' तर मशिदीत घुसून..'; राणेंना वादग्रस्त वक्तव्य भोवलं, अहमदनगरमध्ये गुन्हा दाखल

प्रहारचे आमदार बच्चू कडू यांच्यावर राणा दाम्पत्य थेट प्रहार करत आहेत. त्याच राणा दाम्पत्याला पराभवानंतर देखील भाजपने बळ देण्यास सुरुवात केली आहे. अमरावतीत विदर्भातील सर्वात मोठा दहीहंडी उत्सव राणा दाम्पत्याकडून आयोजित केला जातो. या कार्यक्रमाला प्रमुख म्हणून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे उपस्थित होते. दरम्यान नवनीत राणांच्या पराभवाचा जल्लोष करणाऱ्या विरोधकांना चंद्रशेखर बावनकुळे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. 

नवनीत राणा या भाजपा महायुतीच्या खासदार होणारच त्याची चिंता कोणीही करू नये असा जोरदार हल्लाबोल त्यांनी केलाय. यावेळी चंद्रशेखर बावनकुळे बोलताना म्हणाले की, आमची सीट एका बुथवरील पाच मतांनी गेली. एका बुथवर जर आम्हाला पाच मतं मिळाली असती तर नवनीत राणा आपल्या खासदार राहिल्या असत्या. मात्र नवनीत राणा भाजप महायुतीच्या खासदार झाल्याशिवाय राहणार नाहीत. त्या होणारच आहेत. त्याची काळजी आपण करू नका. असेही त्यांनी जाहीर केले. लोकसभा निवडणुकीनंतर राणा या राष्ट्रपती कोट्यातून राज्यसभेवर जाणार या संदर्भातील चर्चा सुरू झाल्या होत्या. त्यासाठी मधल्या काळात राणा दाम्पत्याला दिल्लीच्या शीर्षस्थ नेत्यांनी आमंत्रण सुद्धा दिल्याची माहिती आहे. आता प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी थेट 'नवनीत राणा खासदार होणार' असं विधान केल्याने राणा दाम्पत्याच्या समर्थकांच्या आशा पुन्हा एकदा पल्लवीत झाल्याचे पाहायला मिळतेय.

नक्की वाचा - Vanraj Andekar : राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकाच्या हत्येने पुणे पुन्हा हादरलं, खुनाचं धक्कादायक कारण

'रवी राणा युवा स्वाभिमानचे आमदार'
नवनीत राणांच्या लोकसभेतील पराभवानंतर राणा दाम्पत्य भाजपपासून दूर जातायेत का? अशा चर्चा अमरावतीत सुरू झाल्या होत्या. चंद्रशेखर बावनकुळे यांनी थेट नवनीत राणा व रवी राणा यांच्या दहीहंडीच्या कार्यक्रमात बळ दिल्याने त्याला पूर्णविराम लागलाय. विरोधकांनी तोंडात बोटे घातली आहेत. याच कार्यक्रमात बावनकुळेंनी देखील स्पष्ट केलं की, रवी राणा हे युवा स्वाभिमान पार्टीचे आमदार आहेत. ते आमच्या महायुतीचे घटक आहेत आणि कायम राहतील असेही त्यांनी आवर्जून सांगितल्याचे पाहायला मिळाले.

Switch To Dark/Light Mode
Previous Article
कल्याण-डोंबिवलीतील खड्ड्यांमुळे शिवसेना आमदाराचा संताप, केडीएमसी आयुक्तांना इशारा
लोकसभेत पराभूत तरीही भाजपकडून बळ; नवनीत राणांबद्दल या बड्या नेत्याचं विधान चर्चेत
central Government approves Rs 2817 crore Digital Agriculture Mission for farmers PM modi
Next Article
केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना भेट, 7 मोठ्या योजनांची घोषणा